![]()
खासगी रिअल इस्टेट कंपनीच्या प्रकल्पाला ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यासाठी तब्बल १ कोटी रुपयांची लाच मागणारे सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पंकजकुमार तसेच सल्लागार प्रसाद स्वामी यांना सीबीआयने अटक केली आहे. त्यांना दोन दिवसांच
.
नवी पनवेलमधील सेक्टर १७ मध्ये दोन इमारतींचे पुनर्विकासाचे काम सुरू आहे. यामध्ये सीजीएसटी व केंद्रीय उत्पादन शुल्कच्या मालकीच्या २४ सदनिका आहेत. या सदनिकांचे हस्तांतरण आणि एनओसीसाठी अधीक्षक पंकजकुमारने १ कोटी रुपये मागितले होते. यातील १० लाखांची लाच सल्लागारामार्फत घेताना सीबीआयने दोघांनाही अटक केली. लाचेत आणखी काही लोकांच्या सहभागाची शक्यता आहे.
दिल्लीच्या कार्यालयातील अधिकारी लाचेत वाटेकरी
पंकजकुमारने १० सप्टेंबरला १० लाख रु. रोख, एका फ्लॅटसाठी २० लाख रुपये डाऊन पेमेंट आणि उर्वरित ७० लाख रुपये नंतर नवी दिल्लीतील डीजी एचआरडी सीजीएसटीच्या अधिकाऱ्यांसाठी मागितल्याचे उघड झाले. या अधिकाऱ्यांचीही चौकशी होऊ शकते.