विकास लवांडेंवरील हल्लेखोरांवर कारवाई करा:शरद पवारांचा पोलिस महासंचालकांसह पुणे पोलिस आयुक्तांना फोन; मुख्यमंत्र्यांनाही भेटणार
वारकरी संप्रदायातील कथित घुसखोरांविरोधात रान छेडल्यामुळे शाईफेक हल्ल्याला सामोरे गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवारांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांसह पुणे पोलिस आयुक्तांशी फोनवरून संवाद साधून आरोपींवर कारवाई करण्याची केली. तसेच लवांडे यांना कायमस्वरूपी पोलिस संरक्षण देण्याचीही मागणी केली. शरद पवार हा मुद्दा मुख्यमंत्र्यांसोबत…