15 मेपर्यंत स्व-गणना करावी; सीईओ सत्यम गांधींचे आदेश:कर्मचाऱ्यांना डिजिटल स्व-गणना सक्तीची; प्रमुखावर जबाबदारी
जनगणना २०२७ अंतर्गत पहिल्या टप्प्यात होणाऱ्या घरयादी व घरगणना (एचएलओ) प्रक्रियेसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने आता कंबर कसली आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी डिजिटल स्व-गणनेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या स्वाक्षरीने एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वतःची…