पंढरपुरात नृत्यांगना राधा पाटीलच्या कार्यक्रमात राडा:किरकोळ वादातून तरुणाला बेदम मारहाण, कार्यक्रम अर्ध्यावर थांबवण्याची वेळ; VIDEO
पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे यल्लमादेवी यात्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या नृत्यांगना राधा पाटील हिच्या कार्यक्रमात मंगळवारी रात्री मोठा राडा झाला. डान्स पाहताना तरुणांमध्ये झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. धक्काबुकी, आरडाओरडा आणि शिवराळ भाषेमुळे कार्यक्रमात प्रचंड गोंधळ निर्माण झाला, परिणामी कार्यक्रम अर्धवट थांबवण्याची वेळ आयोजकांवर आली. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच सुस्ते गावात प्रसिद्ध नृत्यांगना…