गृहमंत्रीच नसरापूर प्रकरणात आरोपी असायला हवेत:1500 रुपये देताय म्हणून बहिणींनी तोंड बंद ठेवावे का? संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल
“राज्यात चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार होतो, कारण गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आपली कर्तव्ये पार पाडण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. या प्रकरणात खरं तर सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले पाहिजे. किंबहुना, या सरकारचेच ‘एन्काउंटर’ केले पाहिजे,” अशा अत्यंत आक्रमक शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर तोफ डागली….