कारची दुचाकीला धडक, दोन्ही वाहने पुलाखाली कोसळली:एक ठार, वसुसायगावची घटना; पुलावरील लोखंडी पाइपइपचे कठडे तुटले
प्रतिनिधी | लासूर स्टेशन नागपूर-मुंबई मार्गावरील वसुसायगाव पुलाजवळ भरधाव कारच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. भास्कर अरुण माळी (२८) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास चारचाकी (एमएच १७ डीएस ३९८२) छत्रपती संभाजीनगरवरून लासूर स्टेशनकडे येत होती. यावेळी वसुसायगाव येथील पुलाजवळ लासूरस्टेशनकडून आंबेगाववाडी येथे…