Headlines

खुलताबाद तालुका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहाने यांची फेरनिवड:सरचिटणीसपदी किशोर वेताळ यांचीही निवड कायम




प्रतिनिधी | खुलताबाद महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या खुलताबाद तालुका नूतन कार्यकारिणी निवडीसाठी पंचायत समिती सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीत विद्यमान अध्यक्ष राजू लहाने यांच्यावर पुन्हा विश्वास दर्शवत त्यांची अध्यक्षपदी तसेच सरचिटणीसपदी किशोर वेताळ यांचीही कायम निवड करून संघटनेच्या सातत्यपूर्ण नेतृत्वाला बळ देण्यात आले. या बैठकीस जिल्हा निरीक्षक अंकुश जाधव व हारून शेख यांची प्रमुख उपस्थिती लाभली. जेष्ठ शिक्षक नेते बी. डी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी उपस्थित पदाधिकारी. कार्यकारिणीत तालुकाध्यक्ष राजू लहाने, तालुका सरचिटणीस किशोर वेताळ, तालुका कार्याध्यक्ष नितीन आंतरकर, तालुका कोषाध्यक्ष संतोष महापुरे यांचा समावेश आहे. बैठकीस शिक्षक नेते बी. डी. जाधव, जिल्हा निरीक्षक अंकुश जाधव, हारून शेख, टी. एन. शिरसाठ, के. टी. हारदे, संतोष महापुरे, योगेश गायकवाड तसेच महिला आघाडीच्या रुक्मिणी चिलवार यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *