Headlines

लोकांना सध्या निवडणुकांपेक्षा दुष्काळ निवारणाची जास्त गरज:निवडणूक आयोगाच्या वादावरही संजय शिरसाटांची प्रतिक्रिया




राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकरी आत्महत्या, निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्याबाबत मंत्री संजय शिरसाट यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. सध्या राज्यातील जनतेसमोर निवडणुकांपेक्षा दुष्काळामुळे निर्माण झालेल्या समस्या आणि तातडीच्या गरजा अधिक महत्त्वाच्या असल्याचे शिरसाट यांनी म्हटले. ‘लोकांना सध्या दुष्काळातील गरजा महत्त्वाच्या’ राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असताना नागरिकांना निवडणुकांपेक्षा दैनंदिन गरजा आणि मदतीची आवश्यकता असल्याचे संजय शिरसाट यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक ती मदत मिळणे सध्या महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्ञानेश कुमारांवर कारवाईबाबत शिरसाटांचे वक्तव्य मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या संदर्भातील प्रश्नावरही शिरसाट यांनी भूमिका मांडली. ज्ञानेश कुमार यांच्याकडून झालेली चूक माफ करण्यासारखी आहे किंवा नाही, हा वेगळा विषय असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांच्यावर कारवाई करायची की नाही, याचा निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी वेळ आणि परिस्थितीचा विचार करावा लागेल, असे शिरसाट म्हणाले. दळवींच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया राजन दळवी यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता, त्यांनी केलेल्या विधानाची दखल एकनाथ शिंदे यांनी घेतली असेल, असे शिरसाट यांनी सांगितले. शिंदे त्यांच्याशी चर्चा करून काय बोलावे आणि काय बोलू नये याबाबत योग्य ती समज देतील, असेही त्यांनी नमूद केले. ‘सात शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याची घटना दुःखद’ गेल्या २४ तासांत सात शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याच्या प्रश्नावर शिरसाट यांनी ही घटना दुःखद असल्याचे म्हटले. सरकारकडून कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जात असून संबंधित कुटुंबांना मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. भूकंपमापक यंत्रणा अद्ययावत करण्याची गरज राज्यातील भूकंपमापक यंत्रणा काही ठिकाणी कार्यरत नसल्याच्या प्रश्नावर शिरसाट यांनी काही भागांत अद्ययावत यंत्रणांचा अभाव असल्याचे मान्य केले. भूकंप तसेच हवामानविषयक परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आधुनिक यंत्रणा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. उपलब्ध यंत्रणा अद्ययावत करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांच्या टीकेवर ‘अर्थ नाही’ सरकारवर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेबाबत विचारले असता, विरोधक त्यांच्या पद्धतीने बोलत असल्याचे शिरसाट यांनी सांगितले. या टीकेमध्ये काही अर्थ नसल्याचे त्यांनी नमूद केले. हेही वाचा.. दुष्काळ जाहीर केला, मग प्रत्यक्ष मदत कधी?: पीएम केअर फंडातूनही महाराष्ट्राला मदत करा, परभणीत आदित्य ठाकरेंचा सरकारवर घणाघात मराठवाडा दुष्काळी पाहणी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी परभणी जिल्ह्यात दाखल झालेल्या आदित्य ठाकरे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. यानंतर परभणीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. “दुष्काळ जाहीर केला, शासनाने जीआर काढून १२ उपाययोजनाही जाहीर केल्या, मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात मदत कधी येणार? वाढत्या शेतकरी आत्महत्या पाहता, जर शेतकऱ्यांची मदत तातडीने पोहोचली नाही, तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा (लॉ अँड ऑर्डर) मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो,” असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *