![]()
यावर्षी ‘अल निनो’च्या प्रभावामुळे राज्यात पावसाने मोठी ओढ दिली असून, त्यामुळे संपूर्ण राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थान या न्यासाने मदतीचा हात पुढे केला आहे. संस्थानच्या वतीने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीस’ 1 कोटी 11 लाख रुपयांचा सहयोग निधी देण्यात आला आहे. हा मदतीचा धनादेश आज, 27 सप्टेंबर 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी श्री संस्थानकडून हा महत्त्वपूर्ण निधी देण्यात आला आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर केल्यामुळे, आगामी काळात राज्यात शेती आणि पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यातच मान्सूनसाठी प्रतिकूल असणाऱ्या ‘एल निनो’चा प्रभाव पुढील वर्षीही कायम राहू शकतो, असा अंदाज वर्तवला जात असल्याने हे संकट अधिक गहिरे होण्याची चिन्हे आहेत. एल निनोच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे विधान नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एल निनोच्या संदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले, मुळात आता जो एल निनो आहे हा अजून शिगेला पोहोचणार आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार फेब्रुवारीत तो पीकला जाईल. फेब्रुवारीनंतर तो खाली येईल, अशी साधारण परिस्थिती आहे. पॅसिफिक महासागरातील उष्णतेमुळे एल निनो तयार होतो. हा कुल डाऊन होईल. वातावरणात बदल होतील, त्यानंतर अल निनो इफेक्ट कमी होईल. पण आपल्याला सगळ्या प्रकारच्या तयारीत राहावे लागेल. एल निनोचा इफेक्ट वाढला तर आपल्याला ज्या अडचणी येतील त्यासाठी सतर्क राहावे लागेल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
Source link
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शेगाव संस्थानचा पुढाकार:मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 1 कोटी 11 लाखांचा निधी सुपूर्द