![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा सेवा आणि ग्रामविकासाचा विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजयुमोच्या वतीने आयोजित वडनगर ते वाराणसी ‘सेवा संकल्प यात्रे’चे शनिवारी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे आगमन झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रमात भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी रविंद्र चव्हाण यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी व गादीचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच यात्रेत सहभागी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे स्वागत केले. गुरुकुंज आश्रमात यात्रेनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने झाली. त्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सेवा, समाजहित आणि ग्रामविकासाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्याचा प्रयत्न या उपक्रमांच्या माध्यमातून करण्यात आला. “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या लेखनातून आणि कार्यातून जनसहभागातून ग्रामोन्नतीचा विचार समाजासमोर मांडला. हाच विचार पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पुढे घेऊन जात आहेत,” असे प्रतिपादन रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केले. तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लोककल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी कार्यरत राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्रदेश सरचिटणीस आ. डॉ. संजय कुटे, खासदार डॉ. अनिल बोंडे, भाजयुमो अध्यक्ष कृष्णराज महाडिक, भाजपा अमरावती ग्रामीण मोर्शी जिल्हाध्यक्ष आ. प्रताप अडसड, आमदार राजेश वानखडे, आमदार चंदू यावलकर, भाजपा अमरावती ग्रामीण मेळघाट जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर, अमरावती महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे, भाजयुमो अमरावती ग्रामीण मोर्शी जिल्हाध्यक्ष सचिन इंगळे, नितीन गुढदे, आरती वानखडे, जयंत डेहनकर, किरण पातुरकर, बादल कुलकर्णी, चेतन गावंडे, डॉ. संगीता शिंदे, चंद्रशेखर भोयर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणे-मुंबईतील रेल्वे प्रवासी संघटनांची रविंद्र चव्हाण यांच्यासोबत बैठक ठाणे-मुंबई परिसरातील रेल्वे प्रवासी संघटनांच्या ४८ संघटनांच्या प्रतिनिधींची भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची डोंबिवली जिमखाना येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुंबई उपनगरीय रेल्वेची क्षमता, सुरक्षितता आणि थेट कनेक्टिव्हिटी वाढवण्यासह प्रवाशांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रवासी संघटनांनी यावेळी कळवा–ऐरोली रेल्वे लिंक तातडीने पूर्ण करणे, बदलापूर–कर्जत तसेच कल्याण–कसारा मार्गावरील ३री व ४थी रेल्वे लाईन प्रकल्पांना गती देणे, ठाणे–कर्जत/कसारा शटल सेवा सुरू करणे, आधुनिक सिग्नलिंग प्रणालीद्वारे लोकलमधील हेडवे कमी करणे, दिवा–वसई–पनवेल थेट कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि कल्याण जंक्शनसह सीएसएमटीपर्यंतच्या रेल्वे पायाभूत सुविधांची क्षमता वाढवणे आदी मागण्या मांडल्या. या मागण्यांसंदर्भातील सविस्तर निवेदन स्वीकारत रविंद्र चव्हाण यांनी चर्चेस सकारात्मक प्रतिसाद दर्शवला . प्रवाशांच्या प्रश्नांबाबत शासनस्तरावर आवश्यक तो पाठपुरावा करून हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच रेल्वेची क्षमता वाढवणे, प्रवाशांना अधिक सुरक्षित व थेट प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे आणि प्रलंबित प्रकल्पांना गती देणे यासाठी संबंधित स्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी कल्याण-डोंबिवलीचे उपमहापौर राहुल दामले, भालचंद्र लोहकरे, नवरे काका, मधुताई कोटियन, लताताई आरगडे, नंदकुमार देशमुख, अनिताताई, वंदनाताई सोनवणे, सिद्धेश देसाई, अनिकेत घमंडी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
Source link
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यभूमीत ‘सेवा संकल्प यात्रे’चे स्वागत:तर ठाणे-मुंबईतील रेल्वे प्रवासी संघटनांची रविंद्र चव्हाण यांच्यासोबत बैठक