Headlines

आदित्य ठाकरे दुष्काळी पाहणी दौऱ्यावर, परभणीत दाखल:थेट बांधावर जाऊन साधतायत शेतकऱ्यांशी संवाद




राज्यावर ओढावलेल्या भीषण दुष्काळी संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांच्या मराठवाडा दुष्काळी पाहणी दौऱ्याचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. आज सकाळीच आदित्य ठाकरे परभणी जिल्ह्यात दाखल झाले असून, त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. परभणीत शेतकऱ्यांशी थेट संवाद सुरू सध्या परभणी जिल्ह्यातील विविध दुष्काळग्रस्त गावांमध्ये आदित्य ठाकरे बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. पावसानं दडी मारल्यानं करपून गेलेली खरीप पिके आणि डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेला हंगाम पाहून हतबल झालेल्या शेतकऱ्यांशी ते थेट संवाद साधत आहेत. प्रशासनाकडून दिली जाणारी पावसाची चुकीची आकडेवारी, पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न याबाबत शेतकरी आपल्या व्यथा आदित्य ठाकरेंकडे मांडत आहेत. यावेळी, “राजकारण बाजूला ठेवून आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असा धीर ते बळीराजाला देत आहेत. आज तीन जिल्ह्यांचा दौरा आदित्य ठाकरे आज दिवसभरात परभणीसोबतच जालना आणि छत्रपती संभाजीनगर या तीन प्रमुख जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. कालच्या दौऱ्यात शेतकऱ्यांनी शासनाच्या कारभारावर आणि मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आज परभणीतील सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारदरबारी कशा प्रकारे मांडतात आणि पुढील काय रणनीती आखतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. सध्या त्यांचा परभणीतील पाहणी दौरा वेगाने सुरू आहे. महाराष्ट्रातील 265 तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर!:राज्याच्या 75 टक्के भागाला तातडीने दिलासा दरम्यान, काल राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यातील 358 पैकी तब्बल 265 तालुक्यांमध्ये अधिकृतरीत्या कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. कृषी आयुक्तांच्या अहवालानुसार या तालुक्यांमध्ये दुष्काळाची पहिली कळ (Trigger-1) लागू झाली असून, महसूल व मदत-पुनर्वसन विभागाने याबाबतचा अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे. राज्यातील सुमारे ७५ टक्के भूभाग आता दुष्काळग्रस्त म्हणून घोषित झाला असून, शेतकऱ्यांसाठी सवलतींची घोषणा करण्यात आली आहे. “यंदाचा दुष्काळ अत्यंत गंभीर आहे. शेतातील पिके करपून गेल्यामुळे बळीराजाच्या हातात काहीही उरलेले नाही. अशा कठीण समयी सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,” असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *