Headlines

सटाण्यात पर्यावरणपूरक उत्सवाला प्रतिसाद:2 हजार मूर्तींचे संकलन




अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने शहरातील नाशिक नाका, भाक्षी रोड, पाठक मैदान, नामपूर रोड, चौगाव रोड आणि नदीपात्र अशा सहा ठिकाणी गणेशमूर्ती व निर्माल्य संकलन केंद्रे उभारली होती. या केंद्रांवर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुमारे दोन हजार गणेशमूर्तींचे संकलन केले. मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी दिवसभर संकलन केंद्रांवर कार्यरत होते. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी निर्माल्याचे संकलन करून त्याची योग्य विल्हेवाट लावली. तसेच विसर्जनानंतर शहरातील रस्ते व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.नगराध्यक्ष हर्षदा पाटील, नगरसेवक तसेच नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध संकलन केंद्रांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. नदीपात्राचे प्रदूषण टाळण्यासाठी गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन न करता संकलन केंद्रांवर जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. नगराध्यक्ष पाटील यांनी नदीपात्र परिसरात प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.दरम्यान, मिरवणुकीत त्र्यंबकेश्वर येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या मदतीसाठी वर्गणी संकलनाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळे गणेशोत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली. पुढील वर्षीही अधिकाधिक नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्ष हर्षदा पाटील यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *