Headlines

वृद्धाश्रमात सहकाऱ्याने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू, 6 गंभीर:संताप अनावर झाल्याने चालण्याच्या काठीने बेदम मारले




एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विळदघाट येथील मातोश्री वृद्धाश्रमात शनिवारी दुर्दैवी घटना घडली. आश्रमात राहणाऱ्या ५४ वर्षीय राजू तुकाराम घुले याने वृद्ध सहकाऱ्यांवर लोखंडी व लाकडी काठीने अचानक निर्दयीपणे हल्ला केला. या भीषण हल्यात दत्तात्रय शंकर हारके (८५) व मंकाळेश्वर बाबुराव हेने (५८) या दोघांचा मृत्यू झाला, तर भांडण सोडवायला आलेले इतर ६ वृद्ध गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये संतोष भिवराज पिरगळ, लिंबराज दामोधर फिसके, साहेबराव दगडू भवर, बाळासाहेब आंबादास घाडगे, गोरख हरिभाऊ फुंदे आणि गणेश छबू घोडके यांचा समावेश आहे. त्यांना तत्काळ उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. दोघांना जास्त मार लागल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. या वृद्धाश्रमात १३ महिला व १७ पुरुष, असे एकूण ३० जण स्त्री-पुरुष अशा दोन विभागात राहतात. वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक दिलीप चोरडिया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हा हल्ला सकाळी ६ च्या सुमारास झाला. जखमींना तातडीने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सततच्या चेष्टेमुळे टोकाचे पाऊल राजू तुकाराम घुले हा मागील वर्षी नोव्हेंबर २०२५ (११ महिने) पासून या वृद्धाश्रमात राहत होता. इतर वृद्ध त्याची सतत खिल्ली उडवत आणि त्याच्या हाताची नक्कल करून हसत. याच अपमानामुळे आणि सततच्या विडंबनामुळे त्याच्या मनात प्रचंड राग निर्माण झाला होता. त्यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलले व इतरांवर हल्ला केला. त्याचे लग्न झाले नव्हते आणि त्याच्यासोबत त्याचा भाऊसुद्धा त्याच वृद्धाश्रमात राहत होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *