Headlines

मनमाड‎:विसर्जनादरम्यान बंदोबस्तातील होमगार्डचे हृदयविकाराने निधन




गणेश विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कर्तव्य बजावत असताना नगरपालिका कर्मचारी तथा होमगार्ड जवान सुनील कारभारी दराडे (५५) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अचानक त्यांच्या छातीत तीव्र कळ आली. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. आनंदवाडी येथील कारंडे मळ्याजवळील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी पोलिस निरीक्षक विजय करे, मुख्याधिकारी शेषराव चौधरी, होमगार्ड पथकप्रमुख सागर कोल्हे, सुनील घोडेकर, प्रकाश पगारे व जालिंदरनाथ वाघ यांच्यासह होमगार्ड पथकातील कर्मचारी व नागरिक यांनी श्रध्दांजली अर्पण केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *