पुण्यात 28 लाखांची लाच स्वीकारताना महिला पोलिस अधिकारी जाळ्यात:30 लाखांची मागणी, 28 वर तडजाेड; 2 लाख ॲडव्हान्स
शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत महिला सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) वैशाली मुरलीधर तोटेवार (४९) आणि तिच्या खासगी हस्तकाला तब्बल २८ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. शनिवारी (२ मे २०२६) दुपारी मंगलदास रोडवरील पंचतारांकित हॉटेल कॉनराडच्या प्रवेशद्वारासमोर ही धडक कारवाई करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेसारख्या महत्त्वाच्या विभागातील अधिकारीच एवढ्या मोठ्या…