कळवणला 17 ग्रामपंचायतींची जालना जिल्ह्यातील परतूरच्या टीमकडून पाहणी:मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विकासकामांचे स्कॅनिंग
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कळवण तालुक्यातील एकूण १७ गावांची परतूर, जि. जालना टीमकडून तपासणी करण्यात येत आहे. ग्रामपंचायत बिलवाडी येथे तपासणी व पाहणी कामासाठी आलेल्या मान्यवर टीमचे ग्रामपंचायतीच्या वतीने उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले . यावेळी उपस्थित जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांची पाहणी करून मार्गदर्शन केले….