सातारा पालिकेत यापुढे सावळागोंधळ खपवून घेणार नाही:खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजेंकडून नगरसेवकांची कानउघडणी; सभेतील वादानंतर बैठक
सातारा नगरपालिकेतील दोन्ही राजेंच्या गटांमधील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाची गंभीर दखल घेत, आज खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही राजेंनी आपापल्या नगरसेवकांची चांगलीच कानउघाडणी केली असून, बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी पालिकेच्या कामकाजात यापुढे कोणताही सावळागोंधळ खपवून घेतला जाणार नाही, असा…