अमरावती जिल्हा परिषदेत बदली सत्र सुरू:चार विभागांतील 38 कर्मचाऱ्यांचे स्थानांतर; आरोग्य विभागाचा टप्पा बाकी
अमरावती: जिल्हा परिषदेतील सर्वसाधारण बदली प्रक्रियेला रविवारी सुरुवात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सत्रात चार विभागांतील ३८ कर्मचाऱ्यांचे स्थानांतर करण्यात आले. ही प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने अत्यंत पारदर्शक वातावरणात पूर्ण झाली. आरोग्य विभागातील उर्वरित कर्मचाऱ्यांच्या बदल्या सोमवारी केल्या जाणार आहेत. बदली सत्रासाठी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात समुपदेशन आयोजित…