तांबडा-पांढरा रस्सा, सावजी मटण अन झुणका-भाकर:'महालक्ष्मी सरस'मध्ये महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा दरवळ; 250 रुपयांपासून थाळी
उमेद अभियानाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून अनेक महिला आर्थिक दृष्ट्या सशक्त झाल्या आहेत. महालक्ष्मी सरस २०२६ मध्ये महिला उद्योजकांनी हस्तकला आणि उत्पादनांसोबतच महाराष्ट्राच्या अस्सल खाद्यसंस्कृतीची समृद्ध मेजवानी खवय्यांचे विशेष आकर्षण ठरत आहे. येथे तयार होणारे सर्व पदार्थ ताजे आणि पारंपरिक पद्धतीने हाताने बनवलेले आहेत. प्रत्येक स्टॉलवर त्या-त्या जिल्ह्याची खासियत, चव आणि संस्कृती…