भाऊ गेला हेच मोठे नुकसान, हा पराभव गौण:गावकऱ्यांनी दिलेला कौल मान्य, धनंजय देशमुख यांचे अश्विनी देशमुखांच्या पराभवावर भाष्य
मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा ग्राम पंचायत निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला आहे. या पराभवाची पंचक्रोशीत चर्चा सुरू असताना आता संतोष यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गावकऱ्यांनी दिलेला कौल आपल्याला मान्य असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. माझा भाऊ गेला हे आमचे मोठे नुकसान आहे. त्यापुढे हा पराभव गौण आहे. गावकऱ्यांचा कौल आम्हाला…