Headlines

"कुठे होता?' विचारताच पत्नीला लाकडी दांड्याने केली मारहाण:राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण येथील घटना‎

“तुम्ही कुठे गेले होते, इतके दिवस कुठे राहत होते?’ असा जाब पत्नीने विचारल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीला शिवीगाळ करत लाकडी दांड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण येथे घडली. याप्रकरणी राहुरी पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शारदा मंगेश वारे (वय २४, रा. शेरी चिखलठाण) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Read More

'चक्काजाम':नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी 9 ऑगस्टला चक्काजाम आंदोलन : आ.सत्यजित तांबे

नाशिक–पुणे सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीसाठीचा लढा आता अधिक तीव्र होणार असून, आगामी ९ ऑगस्ट रोजी (क्रांती दिन) सकाळी ९ वाजता नाशिक–पुणे महामार्गावरील विविध ठिकाणी एकाच वेळी ‘चक्काजाम’ जनआंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. केंद्र सरकारचे या महत्त्वपूर्ण प्रकल्पाकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमदार तांबे म्हणाले,…

Read More

पुरस्कार वितरण:"जेन-झी'च्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहा, अन्यथा क्रांती अटळ

देशातील तरुण पिढी प्रचंड संतापाच्या अवस्थेत असून, त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले नाही तर भविष्यात क्रांती अटळ आहे. मेरिटला डावलून निर्णय घेतले गेले, भ्रष्टाचाराला खतपाणी घातले गेले आणि तरुणांच्या अपेक्षा दुर्लक्षित राहिल्या, तर व्यवस्थेला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा माजी अर्थमंत्री आमदार जयंत पाटील यांनी दिला. श्रीरामपूर नगरपालिकेतर्फे आयोजित ज्येष्ठ संपादक वसंतराव देशमुख जिल्हास्तरीय…

Read More

हजारो भाविकांच्या उपस्थितीत शहरात "बागुल पंडुगू' उत्साहात:उत्तम आरोग्य अन् सर्वांच्या कल्याणासाठी केली प्रार्थना

शहरात बागुल पंडुगू सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील तोफखाना भागातील शितळादेवी मंदिर, बालिकाश्रम रोडवरील लक्ष्मी माता मंदिरात भाविकांची सकाळपासून गर्दी झाली होती. देवीच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. दर्शनानंतर निसर्गाच्या सानिध्यातील सहभोजनाने सण साजरा करण्यात आला. शहरात ठिकठिकाणी सणाच्या शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले होते. सावेडीतील श्रमिकनगर येथे सण अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा…

Read More

मध्यरात्रीपासून दुपारपर्यंत रिपरिप:पाऊस सरासरीच्या 50 टक्क्यांवर

जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी दुपारपर्यंत पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १४.३ मिमी पाऊस झाला असून, १ जूनपासून आजपर्यंत एकूण २२७.४ मिमी पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्याने आतापर्यंत मोसमी सरासरीच्या ५० टक्क्यांहून अधिक टप्पा ओलांडला. जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्री सुरू झालेला पाऊस शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत कायम…

Read More

भारतात आता टेलिकॉम उपकरणे बनवली जाणार:वॉरफेअर शॅलो वॉटरक्राफ्ट मछलीपट्टणम नौदलात सामील, 1 ऑगस्टच्या घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. वॉरफेअर शॅलो वॉटरक्राफ्ट मछलीपट्टणम नौदलात सामील करार ( Agreement) 2. पतंजली मॅग्मा जनरल इन्शुरन्समध्ये हिस्सा खरेदी करेल IRDAI आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 3. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाची ‘स्किझ ट्रॅव्हल्स’वर बंदी Skiez Travels क्रीडा (SPORTS) 4.135व्या ‘ड्युरंड कप’ फुटबॉल स्पर्धेचे शिलाँगमध्ये उद्घाटन 4. देशातील…

Read More

मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याचा गळा दाबून घेतला चावा:नालंदा स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या भांडणानंतर घडली घटना‎

वर्गात दोन मुलांमध्ये झालेल्या‎भांडणाची शहानिशा न करता,‎रागाच्या भरात शाळेच्या‎मुख्याध्यापकाने एका आठ वर्षीय‎विद्यार्थ्याला अमानुष मारहाण‎केल्याचा प्रकार एका शाळेत‎घडला. मुख्याध्यापकाने‎विद्यार्थ्याचा कान पिरगाळून त्याचा‎गळा दाबला आणि त्याला हवेत‎उचलून त्याच्या उजव्या हाताचा‎चावा घेतला. या प्रकरणी‎अहिल्यानगर तालुका पोलिस‎ठाण्यात संबंधित मुख्याध्यापकावर‎गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‎ याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या‎आईने पोलिसांत फिर्याद दिली आहे.‎पोलिसांनी वाळुंज येथील नालंदा‎स्कूलचे मुख्याध्यापक गौतम‎बहादुर्गे (पूर्ण नाव माहीत नाही)‎याच्याविरुद्ध…

Read More

जरांगेंवर आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही:गरज पडल्यास त्यांची भेट घेणार : मंत्री राधाकृष्ण विखे

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांबाबत सरकारने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जेवढे निर्णय घेतले, असे निर्णय यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी घेतले नाहीत. महायुती सरकार मराठा समाजाच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करीत असून मनोज जरांगे पाटील यांच्यावर आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही. वेळ…

Read More

मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांत नुकसान भरपाई द्या:SC ने म्हटले – केंद्र, राज्य सरकारांनी यासाठी कायद्यांत सुधारणा करावी

सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यांवर फिरणाऱ्या बेवारस जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. न्यायालयाने म्हटले – जनावरांना राष्ट्रीय महामार्ग, रस्ते आणि गल्ल्यांमध्ये असेच सोडू शकत नाही. ती नैसर्गिक स्पीड ब्रेकर नाहीत. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने शुक्रवारी केंद्र आणि राज्य सरकारांना अशा अपघातांच्या पीडितांना नुकसान भरपाई देण्याचा नियम बनवण्यास सांगितले….

Read More

बळीराजाला दिलासा:राहुरीत रिमझिम पावसामुळे खरीप पिके तरारली

गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाच्या रिमझिम सरी दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिल्याने या पावसाने राहुरी तालुक्यातील पिकांना दिलासा मिळाला असून पिके हिरवीगार झाली आहेत. तालुक्यात आतापर्यंत मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम असताना रिमझिम पावसावर उभ्या पिकांना जिवदान मिळाल्याने शेतकरी रिमझिम पावसावर दिलासा मिळाल्याने सुखावला आहे. मुळा धरणातील आवक चांगली सुरू आहे. तालुक्यात यंदा शेतकऱ्यांनी पावसाच्या प्रतीक्षेत उशिरा…

Read More