Headlines

29 बेटांना पर्यटनाची ओळख मिळणार:मराठवाड्याच्या अर्थकारणाला नवी दिशा‎




जायकवाडी धरण आता केवळ पाणीसाठ्यापुरतेच मर्यादित न राहता पर्यटनाच्या क्षेत्रात नवी क्रांती घडवण्यास सज्ज होत आहे. धरणाच्या ३५० चौरस किलोमीटरहून अधिक विस्तीर्ण जलाशयात वसलेली तब्बल २९ लहान-मोठी बेटे आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. या बेटांचा पर्यावरणपूरक आणि नियोजनबद्ध विकास केल्यास जायकवाडी हे महाराष्ट्रासह देशातील एक प्रमुख जलपर्यटन केंद्र ठरू शकते, असा विश्वास आमदार विलास भुमरे यांनी व्यक्त केला आहे. जायकवाडी धरणाच्या मध्यभागी पसरलेली बेटे, हिवाळ्यात येथे दाखल होणारे हजारो परदेशी स्थलांतरित पक्षी, निसर्गसमृद्धी, ऐतिहासिक पैठण शहर, संत एकनाथ महाराजांचा आध्यात्मिक वारसा आणि संत ज्ञानेश्वर उद्यान यांची सुंदर सांगड घालून हा परिसर जागतिक नकाशावर आणणे शक्य आहे. कोयना जलाशयातील बोट सफारी, भंडारदरा व उजनी येथील फ्लेमिंगो पर्यटन, तसेच केरळमधील पेरियार तलाव या प्रयोगांमुळे पर्यटनातून महसूल उपलब्ध झाला आहे. जायकवाडीचा विकास करण्यासाठी नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर, जितूभाऊ परदेशी आणि बजरंग लिंबोरे यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. रोटरी क्लबचे अध्यक्ष पवन लोहिया यांच्या मते, वनविभाग, जलसंपदा आणि पर्यटनाच्या नियमांचे पालन करून हा प्रकल्प राबवल्यास पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढेल. शासनाने सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून स्वतंत्र ‘मास्टर प्लॅन’ तयार करून या २९ बेटांचा टप्प्याटप्प्याने विकास केल्यास मराठवाड्याच्या अर्थकारणाला नवी दिशा मिळेल आणि पैठणची ओळख जागतिक पर्यटन पटलावर होईल. प्रस्तावित योजनेनुसार या बेटांवर पर्यावरणपूरक कॉटेज, अत्याधुनिक बोट सफारी, पक्षीनिरीक्षण केंद्र, जलक्रीडा, सायकल ट्रॅक, व्ह्यू पॉइंट, कॅम्पिंग आणि स्थानिक हस्तकला व खाद्यसंस्कृती बाजार अशा विविध सुविधा उभारल्या जाऊ शकतात. मात्र, हा विकास करताना स्थानिक परिसंस्था, पक्षी आणि वन्यजीवांच्या अधिवासाला कोणताही धक्का पोहोचणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे पक्षीतज्ज्ञ संतोष गव्हाणे यांनी स्पष्ट केले. वन्यजीव अधिवास काळजीची गरज



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *