Headlines

38 वर्षीय व्यक्तीवर गॅस्ट्रिक व्हेरिसेसवर यशस्वी उपचार:मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये डॉ. प्रणव वंजारींकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर




मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ. प्रणव वंजारी यांनी 38 वर्षीय रुग्णावर गॅस्ट्रिक व्हेरिसेस या गंभीर आजारावर यशस्वीपणे अत्याधुनिक उपचार केले आहेत. परभणी येथील या रुग्णाला यकृताच्या आजारामुळे ही समस्या उद्भवली होती. गॅस्ट्रिक व्हेरिसेस ही पोर्टल हायपरटेन्शनमुळे उद्भवणारी एक गंभीर स्थिती आहे. यामध्ये पोटातील रक्तवाहिन्या फुगतात आणि फुटल्यास जीवघेणा रक्तस्राव होऊ शकतो. अशा परिस्थितीत त्वरित आणि प्रभावी उपचार आवश्यक असतात. परभणी येथील हा 38 वर्षीय तरुण यकृताच्या आजारामुळे बऱ्याच दिवसांपासून त्रस्त होता. स्थानिक तपासणीनंतर त्यांना हैदराबाद किंवा मुंबई येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. नातेवाईकांच्या ओळखीने ते मेडिकव्हर हॉस्पिटल, संभाजीनगर येथे पोहोचले. संपूर्ण तपासणीअंती डॉक्टरांच्या लक्षात आले की त्यांच्या पोटात अतिरक्तस्राव झाला आहे. डॉ. वंजारी यांनी अत्याधुनिक, मिनिमली इनव्हेसिव्ह इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्यावर ‘PARTO’ आणि ‘CARTO’ ही हायब्रीड प्रक्रिया सुईच्या साहाय्याने केली. या शस्त्रक्रियेमध्ये कॉइलचाही वापर करण्यात आला. या प्रक्रियेमध्ये प्रगत इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावित रक्तवाहिन्यांवर लक्ष्यित उपचार करण्यात आले. यामुळे रुग्णाचा धोका कमी झाला, रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी झाला आणि जलद बरे होण्यास मदत झाली. या यशस्वी उपचारांबद्दल बोलताना डॉ. प्रणव वंजारी म्हणाले, “गॅस्ट्रिक व्हेरिसेससारख्या जटिल आजारांमध्ये लवकर निदान आणि वेळेवर उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमुळे अशा आजारांवर सुरक्षित आणि परिणामकारक उपचार शक्य झाले आहेत.” मेडिकव्हर हॉस्पिटलचे सेंटर हेड डॉ. विशाल कुटे यांनी सांगितले की, मेडिकव्हर हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कुशल तज्ज्ञांच्या सहाय्याने रुग्णांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा देण्यासाठी ओळखले जाते. या यशस्वी उपचारामुळे हॉस्पिटलने पुन्हा एकदा उत्कृष्ट आरोग्यसेवेचा मानदंड प्रस्थापित केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *