Headlines

4.99 कोटी खर्चूनही विद्यापीठाची अभ्यासिका दोन वर्षांपासून बंद:रुक्मिणी नगरातील इमारत विद्यार्थ्यांना प्रवेशाविना, फर्निचरसाठी धावपळ सुरु




अमरावती विद्यापीठाने रुक्मिणी नगरात संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीवर आधारित एक अभ्यासिका बांधली आहे. ‘रुसा’ योजनेतून तब्बल ४.९९ कोटी रुपये खर्चून ही इमारत उभारली. बांधकाम पूर्ण होऊन दोन वर्षे झाली, तरी अभ्यासिका अद्याप विद्यार्थ्यांसाठी खुली नाही. फर्निचर आणि इतर सुविधा अपूर्ण असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी खासगी क्लासेसमध्ये पैसे खर्च करावे लागत आहेत. विद्यापीठ प्रशासनानुसार, इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे, पण फर्निचर व इतर कामे बाकी आहेत. ही कामे लवकरच पूर्ण करून अभ्यासिका खुली केली जाईल, असे विद्यापीठ सांगते. मात्र, विद्यार्थी या उत्तराने समाधानी नाहीत. सिनेटर प्रा. कैलास चव्हाण यांनी सहा महिन्यांपूर्वी सिनेट बैठकीत इमारत सुरु करण्याची मागणी केली होती. प्रशासनाने लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *