Headlines

आयटक आरोग्य खाते कर्मचारी संघटनेची अंजनगाव सुर्जीमध्ये बैठक:राज्य अधिवेशन, मानधनवाढ, पेन्शनसह अनेक मागण्यांवर चर्चा




अंजनगाव सुर्जी येथील माळीपुरा परिसरात आयटकशी संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते संघटनेची बैठक झाली. या बैठकीला अंजनगाव सुर्जी शहरातील आशा सेविका आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत ३ व ४ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या राज्य अधिवेशनावर चर्चा झाली. आशांची मानधनवाढ, पेन्शन आणि कायमस्वरूपी कामाचा दर्जा देण्यासह अनेक मागण्यांवरही विचारमंथन झाले. विनामोबदला काम करण्याची सक्ती करू नये, यावरही चर्चा झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सविता कोलाखरे होत्या. अकोल्याचे कॉम्रेड नयन गायकवाड, नौजवान सभेचे सागर दुर्योधन आणि शुभम बाळापुरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. तसेच, संघटनेची तालुका कार्यकारिणीही निवडण्यात आली. बैठकीला प्रीती माकोडे, दीपाली घाटे, उषा बोडखे, प्रणिता परळकर यांसह अनेक महिला कर्मचारी उपस्थित होत्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *