![]()
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’ परिसरा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भयानक होता की काही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक भागात भरधाव वेगातील बसने तीन खासगी वाहनांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर महामार्गावर एकच गोंधळ उडाला. काही वाहनांमध्ये प्रवासी अडकून पडले होते. अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून पोलिसांकडून अधिक माहिती गोळा केली जात आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. मिसिंग लिंक परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हेल्प फाउंडेशनच्या बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत गॅस कटरच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. काही काळ चारही लेनवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. नंतर पोलिसांनी आणि बचाव पथकांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर हळूहळू वाहतूक पूर्ववत करण्यात आली. मिसिंग लिंक मार्गाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह दरम्यान, या परिसरात अवघ्या चार तासांच्या अंतरात दोन अपघात घडल्याने मिसिंग लिंक मार्गाच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा मार्ग सुरू झाल्यापासून वाहनांचा वेग वाढला असला तरी अतिवेग आणि निष्काळजीपणामुळे अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. पोलिसांनी वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
Source link
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात:वेगाचा कहर! तीन ठार; वाहतूक पूर्ण विस्कळीत, सलग अपघातांनी उडाली खळबळ