Headlines

गौडगावात आज शनैश्वर जन्मोत्सव सोहळा:दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल, अक्कलकोटच्या जागृत मारुती मंदिरात तयारी, महाप्रसाद, यज्ञाचे आयोजन‎



अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील श्री जागृत मारुती मंदिरात शनिवार, १६ मे रोजी शनैश्वर जन्मोत्सवाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक वर्षांनंतर जुळून आलेल्या या विशेष ‘त्रिवेणी योगा’मुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वाता

.

या दुर्मिळ योगाचे औचित्य साधून मंदिर समितीच्या वतीने पहाटेपासूनच विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने श्री मारुतीराया आणि शनिदेवांना जलाभिषेक व दुग्धाभिषेक केला जाईल. विशेष महारुद्राभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे. नवग्रहशांती पूजा, शनि पूजा आणि गजलक्ष्मी पूजन संपन्न होईल. भाविकांच्या सुख-समृद्धीसाठी मंदिरात विशेष यज्ञ आणि होम-हवन करण्यात येणार आहे.दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर समितीने सूक्ष्म नियोजन केले आहे.

गौडगाव मारुती अन्नछत्र मंडळाच्या वतीने दिवसभर ‘अन्नदान सेवा’ सुरू राहणार आहे. दर्शनानंतर प्रत्येक भाविकाला महाप्रसाद मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

मिथुन कलमानी मित्र मंडळाकडून विशेष उपक्रम, मिथुन कलमानी आणि मित्र मंडळ खजुर्गी यांच्या वतीने शनि जन्मोत्सवाच्या निमित्ताने विशेष महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या काळात गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी मंदिर समितीच्या वतीने चोख बंदोबस्त व सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. तसेच नैश्वर जन्मोत्सव आणि शनिअमावस्येच्या या त्रिवेणी योगामुळे भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

दुपारी १२ वाजता रंगणार मुख्य जन्मोत्सव सोहळा जन्मोत्सवाचा मुख्य सोहळा दुपारी १२ वाजता महाआरती आणि गुलाल उधळणीने साजरा होईल. शनैश्वर जन्मोत्सव आणि शनिअमावस्येच्या या त्रिवेणी योगामुळे भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *