![]()
उत्पादनाची हमी असल्याने काही वर्षांत जिल्ह्यातील शेतकरी मोसंबी लागवडीकडे वळले होते. त्यानुसार २४ हजार ६७ हेक्टरवर प्रत्यक्ष लागवड करण्यात आली. मात्र, तीन वर्षांपासून ५ ते ८ रुपयांचा किरकोळ भाव मिळत आहे. त्यामुळे मोसंबीसाठी वर्षभर केलेला खर्चही पदरी पडत नाही. परिणामी, तीन वर्षांत ३,५०० हेक्टरवरील झाडांवर कुऱ्हाड फिरविल्याची विदारक स्थिती आहे. बाजारपेठेतील मंदी, मिळणारा कवडीमोल भाव यामुळे मोसंबी नकोशी ठरत आहे. पैठण तालुक्यात सर्वाधिक ८७९३ हेक्टरवर मोसंबीचे क्षेत्र होते. मात्र, तीन वर्षांपासून दहा टनांचे ३० ते ६० हजार रुपयेच हातात येत आहेत. दोन महिन्यांत हजार हेक्टरवरील मोसंबी शेतकऱ्यांनी काढून टाकली. याठिकाणी ऊसासह इतर पिकांची लागवड केली. बोकुड जळगाव येथील शेतकरी लक्ष्मण शंकर नागे यांनी २७०, तर ढाकेफळ येथील योगेश शिंदे यांनी ४०० मोसंबीची झाडे काढून टाकली. चांगला भावच मिळत नसताना शेती कशासाठी गुंतवून ठेवायची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बाजारपेठेतील घसरण, प्रशासकीय अनास्था यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक संकटात आहे. जिल्ह्यात मोसंबीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. मात्र, मागील ३ वर्षांपासून बाजारात आवक वाढली आहे. मागणी घटल्याचे सांगितले जाते. व्यापाऱ्यांनी दर पाडले आहेत. २०२३ मध्ये मोसंबीला सरासरी १८ ते २२ रुपये प्रतिकिलो दर होता. २०२४ मध्ये १० ते १५, २०२५ मध्ये ८ ते १० दर मिळाला. सध्या अवघा ६ ते १२ रुपये प्रतिकिलो दराने मोसंबी खरेदी केली जात आहे. मोसंबीवर बोरॉन, कॅल्शियमयुक्त सूक्ष्म अन्नद्रव्यांची नियमित फवारणी करावी. उन्हाळ्यात किंवा वाढत्या तापमानात ठिबक सिंचनाद्वारे नियमित, मोजके पाणी द्यावे. फळगळ रोखण्यासाठी योग्य हार्मोन्सची फवारणी करावी. ओलावा टिकवून ठेवण्यासाठी झाडांच्या मुळाभोवती आच्छादन करावे. फळमाशी, थ्रिप्स नियंत्रणासाठी कामगंध सापळे, योग्य कीटकनाशकांचा वापर करावा. बागेत हवा, सूर्यप्रकाश खेळता राहण्यासाठी रोगट, सुकलेल्या फांद्यांची छाटणी करावी. रोगाचा प्रादूर्भाव दिसल्यास लगेच फवारणी करणे आवश्यक आहे. ^मोसंबी बागांचे योग्य नियोजन, संतुलित खत व्यवस्थापन, वेळेवर फवारणी केल्यास फळगळ नियंत्रणात ठेवता येते. हवामानातील बदल लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी तातडीने कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना करणे आवश्यक आहे. विभागाकडून शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत आहे. – विकास पाटील, तालुका कृषी अधिकारी, पैठण एका एकर मोसंबीसाठी वर्षाला खते, औषधे, मजुरी, पाणी, देखभालीसाठी ७० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत खर्च होतो. हवामान बदल, उष्णतेची लाट, रोगराईमुळे उत्पादकताही घटली आहे. व्यापाऱ्यांची मनमानी, शासनाची अनास्था, दरकपात मारक ठरत आहे. माल दर्जेदार असतानाही विविध कारणे देत कमी भाव दिला जातो. रामनाथ कारले, सीईओ, सिट्रेस इस्टेट, पैठण तालुका मोसंबी क्षेत्र (हे.) पैठण ८७९३ संभाजीनगर ६०३० गंगापूर ३४९३ कन्नड २६०१ वैजापूर २११८ सोयगाव ५४० खुलताबाद २४८ फुलंब्री १४५ सिल्लोड ९९ एकूण क्षेत्र २४०६७ २२ रुपयांचा दर आला ६ वर वेळेवर औषधांची फवारणी आवश्यक एक एकरसाठी ७० ते १ लाखांपर्यंत खर्च
Source link
3 वर्षांपासून मोसंबीला भाव मिळेना; 3,500 हेक्टरवरील झाडांवर कुऱ्हाड:जिल्ह्यात 24 हजार 67 हेक्टर मोसंबीचे क्षेत्र, वर्षाचे उत्पन्न 30 हजार