Headlines

नापिकीला कंटाळून शेतकरी आत्महत्या:गंगापूर तालुक्यातील लखमापूर येथील घटना‎




तालुक्यातील लखमापूर येथील शेतकऱ्याने नापिकी, कर्जबारीपणास कंटाळून विषारी द्रव प्राशन करीत शनिवारी आत्महत्या केल्याची घटना लखमापूर येथे घडली. चंद्रभान कचरू गाढे (५४) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी रात्री चंद्रभान गाढे हे गावातून जाऊन येतो असे सांगून घरातून निघाले होते. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने घरच्यांनी त्यांची शोधाशोध केली पण ते सापडले नाही. शनिवार सकाळी ६ वाजता अमळनेर गायरानामधील पाझर तलावात ते मृतावस्थेत आढळले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, दोन विवाहित मुली असा परिवार आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसात नोंद केली आहे. चंद्रभान गाढे यांना गट नं. ९२ मध्ये एक एकर शेती आहे. कांदा व शेतमालाला भाव नसल्याने त्यांची शेती तोट्यात होती. लखमापूर सोसायटीचे २६,००० कर्ज तसेच इतर काही खाजगी लोकांचे हातउसने कर्ज व पती पत्नींचे आजारपण या विवंचनेत त्यांनी त्यांची जीवनयात्रा संपवली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *