Headlines

40% more devotees than capacity in Kedarnath, night problems increased, struggle at an altitude of 12 thousand feet


  • Marathi News
  • National
  • 40% More Devotees Than Capacity In Kedarnath, Night Problems Increased, Struggle At An Altitude Of 12 Thousand Feet

मनमीत15 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

यावर्षी उत्तराखंडस्थित केदारनाथ धाममध्ये येणारी अफाट गर्दी व त्यांना हाताळण्यासाठी केलेली व्यवस्था चिंता वाढवत आहे. परिस्थिती अशी आहे की, समुद्रसपाटीपासून १२ हजार फूट उंचीवर हजारो भाविक दररोज दर्शनासाठी धडपड करत आहेत, कारण रोज सरासरी २५ हजार भाविक पोहोचत आहेत.

प्रशासनाचा दावा आहे की, यावेळी प्रवासी क्षमता वाढवून २२ ते २४ हजार केली, परंतु यात्रेच्या पहिल्या दिवसापासूनच यापेक्षा जास्त भाविक येत आहेत. त्यामुळे घोडा पडावपासून ते मंदिरापर्यंतची सर्व दुकाने, टेंट, गेस्ट हाऊस, छोटे लॉज सर्व हाऊसफुल्ल आहेत व आणीबाणीच्या स्थितीत थांबावे लागल्यास एका खोलीचे एका रात्रीचे भाडे ५ ते १० हजारांपर्यंत जात आहे. ५ बाय ३ चे टेंटही २ ते ६ हजारांत मिळत आहेत. दुसरीकडे, २१ किमी खाली असलेल्या गौरीकुंड व सोनप्रयागमध्येही अशीच स्थिती आहे. थांबण्यासाठी बजेटमधील जागा मिळण्यात अडचण येत आहे.

असे म्हणता येईल की, केदारनाथ धाम या वेळी चारधाम यात्रेच्या इतिहासातील सर्वाधिक भाविकांचे साक्षीदार बनत आहे. गत २५ दिवसांत विक्रमी ५.५० लाखांपेक्षा जास्त भाविक येऊन गेले. दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच रांगेस सुरुवात होते, जी दिवसभरात १ ते २ किमी लांब राहते. जर सकाळी ४ वाजता रांगेत उभे राहिले, तर ८ ते १० तासांनंतरच मंदिरापर्यंत पोहोचता येते.

२१ किमी चढाईनंतर दीड किमी लांब रांग लागते. बिकानेरहून १२ जणांच्या कुटुंबासह आलेले सुरेश पारिख यांनी सांगितले की, वर एका खोलीचे २० हजार रुपये मागत होते, घासाघिसीनंतर १२ हजारात व्यवहार ठरला. सकाळी ४ वाजता दर्शनासाठी रांगेत उभे राहिले तर दुपारी एक वाजता मंदिरात पोहोचता आले. दर्शनही बाहेरूनच झाले. वास्तविक, शिवलिंगाला स्पर्श करण्याची वेळ सकाळी ४ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आहे. यानंतर भोजन, हवन, शृंगार यासाठी मंदिराचे कपाट बंद केले जातात.

२५०० रुपयांत व्हीआयपी दर्शन, यामुळे सर्वसामान्यांची प्रतीक्षा वाढली

दर्शनाची प्रतीक्षा व्हीआयपी व्यवस्थेमुळेही बिघडली आहे. हेलिकॉप्टरने येणारे भाविक मंदिर समितीला २५०० रुपये शुल्क देतात, त्यामुळे त्यांना गर्भगृहात आधी जाऊ दिले जाते. यामुळे रांगेतील भाविकांची दर्शनासाठीची प्रतीक्षा वाढते. एवढ्या गर्दीसाठी शौचालयांची संख्या खूपच कमी पडत आहे. सुलभ इंटरनॅशनलचे प्रभारी धनंजय पाठक यांच्या मते, २३९ शौचालये आहेत. ६० नवीन शौचालये बांधली जात आहेत. ४१२ स्वच्छता कर्मचारी आहेत, जे अनेकदा २० तास ड्युटी करतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *