Headlines

करमाळ्यात पारंपरिक मिरवणुकीत मावळ्यांचा सहभाग ठरला लक्षवेधी:तालुक्यात छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी‎



करमाळा शहर व तालुका उत्सव समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. स्वराज्याचा विस्तार करत स्वाभिमान जपणाऱ्या योद्ध्याला अभिवादन करण्यासाठी करमाळकरांनी अभूतपूर्व गर्दी केली होती.

.

सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण जयंतीचे औचित्य साधून सकाळी पारंपरिक विधी व पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दिवसभर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिकांची मांदियाळी पाहायला मिळाली. संपूर्ण परिसरात छत्रपती शंभूराजांच्या जयघोषाने एक वेगळाच चैतन्यमय उत्साह संचारला होता.

पारंपरिक सवाद्य मिरवणुकीने वेधले लक्ष संध्याकाळी शहरातून भव्य आणि पारंपरिक सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

आनंदोत्सव आणि शिवभक्ती मिरवणुकीदरम्यान उपस्थित नागरिकांनी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. या सोहळ्यामुळे करमाळा शहरात सर्वत्र उत्साह, अभिमान आणि शिवभक्तीचे वातावरण पाहायला मिळाले. उत्सव समितीने केलेल्या नियोजनामुळे हा जयंती सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. मिरवणुकीत सजवलेले घोडे आणि छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिकात्मक मूर्ती आकर्षणाचे केंद्र होती. विविध पारंपरिक वेशभूषेतील मावळ्यांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. ढोल-ताशांच्या गजरात आणि शिवगर्जना देत तरुणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

प्रमुख वैशिष्ट्ये



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *