Headlines

पुणे बिबवेवाडीत मसाज पार्लरवर पोलिसांचा छापा:देहविक्री प्रकरणी एका महिलेला अटक, दोन तरुणींची सुटका




पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्रय रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंध विभागाने ही कारवाई केली. या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून, दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव किरण भरतराज अवदुते (वय ३०, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे आहे. तिच्याविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात देहविक्रय प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना बिबवेवाडीतील ‘विश्व आयुर्वेद उपचार केंद्रा’त मसाजच्या नावाखाली देहविक्रय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला. त्यानंतर, मिळालेल्या माहितीची पुष्टी झाल्यावर पोलिसांनी तात्काळ छापा टाकून ही कारवाई केली. ही कारवाई पोलिस उपायुक्त विवेक मासाळ आणि सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस निरीक्षक छगन कापसे, उपनिरीक्षक विशांत चव्हाण, ईश्वर आंधळे, तुषार भिवरकर, बबनराव केदार, अमोल रसाळ, कोंडे आणि इंगळे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली. गांजा विक्री करणारे रिक्षाचालक गजाआड, ३५ किलो गांजासह रिक्षा जप्त रिक्षातून गांजा विक्री करणाऱ्या दोन रिक्षाचालकांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३५ किलो गांजा, रिक्षा असा आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चारुदत्त काळूराम चव्हाण (वय २५, रा. गंगानगर, फुरसुंगी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक कात्रज परिसरात गस्त घालत होते. आंबेगाव सेवा रस्त्यावर एक रिक्षाचालक थांबला असून, तो गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी चव्हाणला पकडले. त्याच्याकडून ३३ किलो गांजा आणि रिक्षा जप्त केली. चौकशीत तो रिक्षातून फिरून गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला अटक केली. दोन दिवसांपूर्वी भारती विद्यापीठ परिसरातून रिक्षातून गांजा विक्री करणाऱ्या एका रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून अर्धा किलो गांजा, तसेच रिक्षा जप्त करण्यात आली होती. पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, गुन्हे शाखेचे निरीक्षक कैलास कोडग, सहायक पोलिस निरीक्षक स्व्पनील पाटील, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, महेश बारावकर, मंगेश पवार, किरण साबळे, मंगेश गायकवाड, तुकाराम सुतार, अवधूत जमदाडे, सचिन सरपाले, मितेश चोरमले, नीलेश खैरमोडे यांनी ही कारवाई केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *