Headlines

सातारा क्राईम जगत:वृद्ध महिलेला लाकडी स्टिकने मारहाण; अल्पवयीन मुलीचा पाठलाग, तरुणाविरुद्ध छेडछाडीचा गुन्हा




सातारा तालुक्यातील लिंब गावातील चतुरबेट परिसरात कौटुंबिक वादातून एका ६५ वर्षीय महिलेला लाकडी स्टिकने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लिंब गावातील चतुरबेट येथे १५ मे रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास ही घटना घडली. वत्सला हणमंत सावंत (वय ६५) यांना सोहम सुभाष सावंत (रा. लिंब) याने “तू वहिनीला कुठे लपवले आहे?” असा जाब विचारत संतापाच्या भरात मारहाण केली. आरोपीने हातातील लाकडी स्टिकने त्यांच्यावर हल्ला केल्याने त्या जखमी झाल्या. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा अधिक तपास महिला पोलिस हवालदार गायकवाड करत आहेत. सैदापूरमध्ये बिअर बारसमोर हाणामारी
सातारा तालुक्यातील सैदापूर येथे बिअर बारसमोर झालेल्या वादातून एका व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सैदापूर गावच्या हद्दीतील एका बिअर बारच्या बाहेर १४ मे रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुधीर मानसिंग जाधव (रा. मोळाचा ओढा) याने किरण कलेराव गोगावले (वय ३७, रा. वर्ये) यांना मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सातारा तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा अधिक तपास सहाय्यक फौजदार माने करत आहेत. विश्वास संपादन करून मोबाईल चोरी, खात्यातील ३१ हजारांवर डल्ला शाहूपुरी परिसरात विश्वास संपादन करून एका व्यक्तीचा मोबाईल चोरी करत त्याच्या खात्यातून तब्बल ३१ हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील आझादनगर कॉलनीतील गणेश मंदिरासमोर ९ एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली. फिर्यादी मनीष माधवराव डेरे (वय ५८, रा. राधिका चित्रपटगृहाशेजारी) यांचा विश्वास संपादन करून प्रेम डी. सुर्वे याने त्यांचा मोबाईल चोरून नेल्याची तक्रार आहे. मोबाईल चोरी केल्यानंतर आरोपीने मोबाईलमधील आर्थिक व्यवहारांचा गैरवापर करत संबंधित खात्यातून सुमारे ३१ हजार रुपये काढल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार राजगे पुढील तपास करत आहेत. अल्पवयीन मुलीचा पाठलाग, तरुणाविरुद्ध छेडछाडीचा गुन्हा सातारा शहरात एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त होत आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना १४ मे रोजी दुपारी साडेबारा ते पावणेएक या वेळेत सातारा शहरात घडली. वेदांत संतोष कांबळे (वय २०, रा. पंताचा गोट) याने अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिच्याशी गैरवर्तन केल्याची तक्रार दाखल झाली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *