Headlines

हिंगोली जिल्ह्यात डिझेलची अचानक मागणी वाढल्याने टंचाई:वाहनधारकांनी आवश्यक तेवढेच डिझेल घ्यावे, प्रशासनाचे आवाहन




हिंगोली जिल्ह्यात मागील पंधरा दिवसात डिझेलची अचानक मागणी वाढली असून त्यामुळे डिझेलचा तुटवडा भासू लागला आहे. मात्र कंपन्यांकडून डिझेलचा पुरवठा सुरळीत होत असून वाहनधारकांनी आवश्यक तेवढे डिझेल भरावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील पंधरा दिवसापासून डिझेलची मागणी अचानक वाढली आहे. सध्या शेतीची कामे सुरू असून नांगरणी व इतर मशागतीची कामे ट्रॅक्टर द्वारे केली जात आहे त्यामुळे जिल्ह्यामध्ये डिझेलची मागणी वाढली आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये 86 पेट्रोल पंप असून या ठिकाणावरून डिझेलची विक्री केली जाते. हिंगोली जिल्ह्यांमध्ये दररोज साधारणता दोन लाख ते सव्वा दोन लाख लिटर डिझेलची आवश्यकता भासते. त्यानुसार मनमाड, अकोला व सोलापूर येथील डिझेल कंपन्यांच्या डेपोवरून जिल्ह्यात डिझेलचा पुरवठा केला जातो. मात्र पंधरा दिवसात अचानक सव्वा तीन लाख ते साडेतीन लाख लिटर डिझेल दररोज लागत आहे. पंपावर ट्रॅक्टर चालकांची गर्दी होऊ लागली आहे. शेती मशागतीच्या कामामुळे ही गर्दी होत असल्याचे चित्र आहे. डिझेलची गरज व पुरवठा यामध्ये तफावत निर्माण झाल्यामुळे त्यांच्या निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच सुट्टीच्या दिवशी डेपोवरून डिझेलचा पुरवठा केला जात नाही त्यामुळे डिझेल पुरवठ्यामध्ये सुट्टीच्या दिवशी खंड पडत आहे. याचाही परिणाम डिझेल पुरवठ्यावर होऊ लागल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व डिझेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून तातडीने आवश्यक डिझेल पुरवठा करावा अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार डिझेलचा पुरवठा होऊ लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाहन चालकांनी डिझेल घेण्यासाठी गर्दी करू नये. तसेच त्यांना आवश्यक तेवढेच डिझेल खरेदी करावे. कंपन्या कडून दररोज डिझेल पुरवठा होत असून पुढील काळात डिझेलचा पुरवठा सुरळीत होईल असेही जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी सांगितले. लगतच्या जिल्ह्यामधूनही डिझेल घेण्यासाठी गर्दी हिंगोली जिल्ह्यातील डिझेल पंपावर लगतच्या जिल्ह्यातील वाहनधारकांची डिझेल खरेदी करण्यासाठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील डिझेलचा पुरवठा झाल्यानंतर काही वेळातच डिझेल संपत असल्याचे चित्र आहे. सोमवारी ता १८ सर्व डिझेल पंपावर डिझेल प्राप्त झाले होते मात्र गर्दीमुळे काही वेळातच डिझेल संपल्याने 70 टक्के डिझेल पंप बंद झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *