![]()
राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाला डिझेल दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. डिझेलच्या किमतीत प्रति लिटर ३ रुपये १० पैशांची वाढ झाल्यामुळे महामंडळावर वार्षिक तब्बल १२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. परिवहन मंत्री तथा
.
सध्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला, तरी प्रवाशांवर तातडीने भाडेवाढ लादली जाणार नाही, अशी ग्वाही मंत्री सरनाईक यांनी दिली आहे. सोबतच, परिवहन विभागाने मनमानी कारभार करणाऱ्या ई-बाईक अॅग्रीगेटर कंपन्यांनाही कडक नियमावली लागू केली आहे.
‘ओला-उबेर, रॅपिडो’ला कडक इशारा अन् नवे नियम
“शासनाच्या अटी-शर्ती मान्य करूनच व्यवसाय करा, प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही,’ अशा शब्दांत सरनाईक यांनी कंपन्यांना सुनावले आहे.
- १००% ई-बाइक सक्ती: कंपन्यांना फक्त ई-बाइक वापरणे बंधनकारक राहील. पेट्रोल वाहने वापरल्यास थेट काळ्या यादीत टाकण्यात येईल.
- चारित्र्य तपासणी अनिवार्य: सर्व चालकांचे पोलिस चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करावेच लागतील.आरटीओकडे थेट नियंत्रण: कंपन्यांच्या अॅपचा ‘रिअल टाइम डेटा ॲक्सेस’ आरटीओ विभागाला द्यावा लागेल.
- ‘एक चालक, एकच कंपनी’: सध्या चालक एकाच दिवशी अनेक अॅपवर काम करतात. सुरक्षेसाठी चालकाला एका दिवसात फक्त एकाच कंपनीकडून लॉगीनची परवानगी देण्याचा विचार सुरू आहे.
- सुरक्षा फीचर्स: अॅपवर प्रवाशांना परवाना, वाहनाचा क्रमांक, चालकाचा फोटो आणि ‘पॅनिक बटन’ दिसणे बंधनकारक राहील.
भाडेवाढीच्या प्रस्तावावर प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर निर्णय
सर्वसामान्य प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडावा यासाठी शासन इंधन बचत, ई-बसचा वाढता वापर आणि महसूलवाढीच्या इतर पर्यायांवर भर देत आहे. भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी पाठवला जाईल, त्यांच्या मंजुरीनंतरच अंतिम निर्णय होईल. – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
असा पडणार ‘एसटी’वर आर्थिक बोजा
- एसटीला दररोज सरासरी १०.८७ लाख लिटर डिझेल लागते. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून मिळणाऱ्या डिझेलचे दर ८८.२१ रुपयांवरून आता ९१.३१ रुपये प्रति लिटर झाले आहेत:
- दैनिक अतिरिक्त खर्च: ३३ लाख ७० हजार रुपये.
- मासिक अतिरिक्त भार: १० कोटी रुपये.
- वार्षिक अतिरिक्त बोजा: १२४ कोटी रुपये.
- एप्रिल २०२६ मधील तोटा: एसटी महामंडळाला आधीच ७६ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.