Headlines

बिहारमधील थरारक हत्याकांडाचे आरोपी छत्रपती संभाजीनगरात जेरबंद:4 जणांचे केले होते 18 तुकडे, ओळख लपवून शेंद्रा एमआयडीसीमध्ये करत होते काम




चार जणांची हत्या करून 18 तुकडे करणारे आरोपी छत्रपती संभाजीनगरातून केले अटक, ओळख लपवून शेंद्रा एमआयडीसीमध्ये करत होते काम; टेलरच्या टॅगमुळे बिहार पोलिसांना सुगावा बिहारमधील एकाच कुटुंबातील 4 जणांची निर्घृण हत्या करून त्यांचे 18 तुकडे करणारे दोन मुख्य आरोपी छत्रपती संभाजीनगरातून गजाआड झाले आहेत. बिहार पोलिसांच्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने जाधववाडी परिसरातील शरद टी पॉईंटवरून ही कारवाई केली. गौतम उर्फ राहुल गुप्ता (22, रा. डहरक, बिहार) आणि दीपक देवसिंग राजपूत (27, रा. नाचनवेल, कन्नड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार विकास गुप्ता याला बिहार पोलिसांनी आधीच अटक केली आहे. 18 तुकडे करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न हत्याकांडानंतर रात्री कुऱ्हाडीने चारही मृतदेहांचे 18 तुकडे करून ते सुटकेस व प्लास्टिकच्या पोत्यात भरण्यात आले. हे तुकडे स्कूटीवरून नेऊन दुर्गावती नदी आणि कर्मनाशा कालव्यात फेकले गेले. पुरावा नष्ट करण्यासाठी घरातील रक्ताचे डाग धुवून त्यावर सिमेंट टाकण्यात आले. टेलरचा टॅग आणि पोलिसांचा छडा नदीत सापडलेल्या मृतदेहांच्या शर्टवरील टेलरच्या नंबरवरून आणि मुलाच्या अंगणवाडी ड्रेसच्या टॅगवरून पोलिसांनी तपास करत डहरक गाव गाठले, तेव्हा घर बंद आढळले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी छत्रपती संभाजीनगरमधील शेंद्रा एमआयडीसीत लपल्याचे समोर आले. 16 मे रोजी बिहार पोलिसांनी येथील गुन्हे शाखेशी संपर्क साधला. पोलिसनिरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या पथकाने काही तासांतच दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन 17 मे रोजी बिहार पोलिसांच्या स्वाधीन केले. चिमुकल्यांसह चौघांची निर्घृण हत्या 7 मे रोजी दुपारी आरोपींनी कृष्ण मुरारी आणि त्यांची पत्नी दुर्गेश कुमारी यांची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर अंगणवाडीतून घरी आलेल्या अंश (8) आणि प्राची (4) या निष्पाप चिमुकल्यांनी आई-वडिलांचे मृतदेह पाहिले. आपले बिंग फुटू नये म्हणून नराधमांनी या दोन्ही मुलांचाही गळा घोटला. आईचा छळ अन् जमिनीचा वाद मृत कृष्ण मुरारी (45) आणि त्यांची पत्नी दुर्गेश कुमारी हे 70 वर्षांच्या वृद्ध आईला घरात मारहाण व छळ करत असत. तसेच भावांमध्ये जमिनीचाही वाद होता. 5 मे रोजी आईने लहान मुलगा विकासला फोन करून मोठ्या भावाच्या मारहाणीबद्दल सांगितले. यामुळे संतापलेल्या विकासने मुंबईत हत्येचा कट रचला आणि त्याचा मूकबधिर भाऊ राहुल व मित्र दीपक राजपूत यांना सोबत घेऊन गावी डहरक (जि. कैमूर) गाठले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *