Headlines

Shilpa Shettys Club Video Goes Viral


अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पुण्यातील मुंढवा परिसरातील बॅस्टियन क्लबमध्ये अश्लील चाळे सुरू असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तरुण – तरुणी सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करताना दिसत असल्यामुळे पुण्यातील पब संस्कृती व नाईटला

.

शिल्पा शेट्टीचा बॅस्टियन क्लब यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत आला होता. आता पुन्हा त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत मोठ्या आवाजातील संगीत, डान्स फ्लोअरवरील गर्दी व मद्यधुंद वातावरण दिसून येत आहे. याचवेळी काही तरुण व तरुणी क्लबमधील सोफ्यावर बसून सर्वांपुढे अश्लील चाळे करत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे त्यांचे हे कृत्य सुरू असताना क्लबमध्ये त्यांच्या आजुबाजूला क्लबमध्ये आलेल्या अनेकांची उपस्थिती होती. हे कृत्य पाहून अनेकांनी तेथून बाहेर पडणे पसंत केले. तर काहींनी या घटनेचा व्हिडिओ तयार करून व्हायरल केला.

दुसरीकडे, हा व्हिडिओ केव्हाचा आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. दिव्य मराठी त्याची पुष्टीही करत नाही. पण या व्हिडिओचे सोशल मीडियात तीव्र पडसाद उमटलेत. सार्वजनिक ठिकाणी आणि एवढ्या गर्दीत चाललेल्या या ओंगळवाण्या प्रकारावर पुणेकर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. विशेषतः पालकांमध्ये या घटनेमुळे मोठी चिंता निर्माण झाली आहे. शहरातील तरुण पिढी पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी जाऊन नेमक्या कोणत्या दिशेने चालली आहे? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. क्लबमध्ये असे प्रकार राजरोसपणे सुरू असताना क्लब प्रशासनाचे याकडे लक्ष कसे गेले नाही, हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

हे ही वाचा…

ऑटोचालकावर कोयत्याने भयंकर हल्ला:पुण्यातील राजमाता भुयारी मार्ग पुलावरील घटना; पुलावरून खाली पडला म्हणून वाचला, VIDEO

पुण्यातील कात्रज ते नवले ब्रिज मार्गावरील राजमाता भुयारी मार्गावरील पुलावर एका ऑटो चालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात हल्लेखोर रिक्षा चालकावर कोयत्याने सपासप वार करत असल्याचे दिसून येत आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे पुण्यात भीतीची लाट पसरली आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.