Headlines

2000 out of 7500 petrol pumps in the state are dry; Queues of vehicles in Sambhajinagar, petrol-diesel stock sufficient for a month- Bhujbal


  • Marathi News
  • National
  • 2000 Out Of 7500 Petrol Pumps In The State Are Dry; Queues Of Vehicles In Sambhajinagar, Petrol diesel Stock Sufficient For A Month Bhujbal

नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

अमेरिका-इराण युद्धामुळे तेल कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल-डिझेलचे दर ९० पैसे प्रतिलिटरने वाढवले. यामुळे दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत वाढून ९८.६४ रुपये तर डिझेलची ९०.६७ रुपये झाली आहे. शुक्रवारीच दोन्ही दर प्रत्येकी ३-३ रुपये प्रति लिटरने वाढले होते.

फेब्रुवारीत युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत कच्च्या तेलाचे दर ५०% हून अधिक वाढले आहेत. त्यामुळे ताज्या दरवाढीनंतरही तेल कंपन्यांना पेट्रोलवर सुमारे १० रुपये तर डिझेलवर १३ रुपये प्रतिलिटरचा तोटा होत आहे. याचे मोठे कारण होर्मुझ जलमार्ग बंद असणे हे आहे.

पेट्रोल पंपांची स्थिती अशी संभाजीनगर : ३३५ पैकी ५५ ड्राय अहिल्यानगर : ४०० पैकी २०० ड्राय नाशिक : ७२५ पैकी ७५ पंप जळगाव : ३७१ पैकी १५० पंप ड्राय

प्रतिनिधी | मुंबई

पेट्रोल-डिझेलचे दर आणखी भडकणार अशी भीती व्यक्त होत असल्याने लोकांनी मोठ्या प्रमाणावर इंधनाचा साठा करणे सुरू केले आहे. त्याचा परिणाम होऊन राज्यातील सुमारे ७५०० पैकी २००० पेट्रोल पंप ड्राय झाले. ज्या पंपांकडे इंधन आहे तेथून ते खरेदी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगावसह अनेक शहरांत वाहनांच्या रांगा लागल्या. दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलिंडरचा महिनाभर पुरेल एवढा साठा आहे, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात इंधनाच्या मागणीत २० टक्क्यांची वाढ झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी पेट्रोल-डिझेल सुमारे ३ रुपयांनी महागले. सोमवारी रात्री अशी माहिती पसरली की, आठवडाभरात आणखी दहा रुपयांची दरवाढ होणार आहे. त्यामुळे टाकी फुल करून घेण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या. मंगळवारीही अशीच स्थिती होती. त्यामुळे उपलब्ध स्टॉक संपला. दरम्यान, राज्यात १ ते १५ मे कालावधीत डिझेलच्या मागणीत १९.६६% तर पेट्रोलच्या मागणीत २०.३९% वाढ झाली आहे.

संभाजीनगरात इंधनाचे दर प्रकार जुने दर नवे दर पेट्रोल ~ 108.56109.22 पॉवर पे. ~ 117.59118.94 डिझेल ~ 95.0195.72

फळे-भाज्या १० ते १५% पर्यंत महागण्याची शक्यता

पेट्रोल-डिझेल अजून किती महाग होऊ शकतात?

तेल कंपन्यांचे नुकसान ५०% पर्यंत कमी करण्यासाठी किमान १० रुपयांपर्यंत दर वाढवणे आवश्यक आहे. म्हणजेच पुढे ५-६ रुपयांची वाढ शक्य आहे.

महागड्या तेलाचा परिणाम?

डिझेल हे सर्वाधिक (४०%) वापरले जाणारे इंधन आहे. बार्कलेजचा अहवाल सांगतो की, डिझेल महाग म्हणजेच मालवाहतूक महाग. जूनपासून किरकोळ महागाई दर वाढणे निश्चित आहे. यामुळे फळे-भाज्या १५% महाग होऊ शकतात. पॅकेटबंद दूध, एफएमसीजी उत्पादनांचे दरही वाढवण्याची तयारी आहे.

तेलाच्या किमतीतील वाढ विकसित देशांपेक्षा कमी आहे?

अमेरिका, ब्रिटन आदी विकसित देशांमध्ये इंधनाचे दर थेट आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाशी जोडलेले आहेत. तिथे २८ फेब्रुवारीनंतर आतापर्यंत पेट्रोल-डिझेल ३५% ते ४५% पर्यंत महागले आहेत. भारतात सध्या दर केवळ ४% वाढले आहेत.

तेल कंपन्यांना सध्या किती नुकसान होत आहे? दोन टप्प्यांत ४ रुपये वाढल्याने तेल कंपन्यांचा तोटा २५% ने कमी झाला आहे. त्यांना आजही दररोज ७५० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *