Headlines

मागणीच्या तुलनेत अल्प पुरवठा; पंपांवर डिझेल नसल्याचे फलक:वणी परिसरात वाहतूकदारांसह उद्योगधंदे अडचणीत; शेतीची कामे खोळंबली‎



डिझेलचा अपुरा पुरवठा, वाढती मागणी यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. शेतकरी, वाहतूकदार, व्यापारी, उद्योगधंदे तसेच सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत असून पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी वाहनांच्या रांगा वाढल्या आहेत.

.

जागतिक स्तरावरील घडामोडींचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेवर होत असून ग्रामीण भागातही त्याची तीव्रता जाणवू लागली आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अनेक नागरिक इलेक्ट्रिक शेगडी व चुलीकडे वळले आहेत. गॅस एजन्सीकडून पुरेसा पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून होत आहेत, तर मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा असल्याचे एजन्सी चालकांचे म्हणणे आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्याचे फलक लावण्यात आले आहेत. डिझेल मिळणार नाही या भीतीने काहीजण साठवणूक करत असल्याने परिस्थिती आणखी बिकट होत आहे. डिझेलच्या टंचाईचा थेट परिणाम शेती, वाहतूक आणि उद्योग क्षेत्रावर होत आहे. शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्याने शेतीची कामे खोळंबत आहेत. पिकअप, टेम्पो आणि ट्रकचालकांना डिझेलसाठी विविध ठिकाणी भटकंती करावी लागत आहे. कृषी उत्पादने बाजारपेठेत पोहोचविण्यात अडचणी निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. कांदा व्यापारी, धान्य व्यापारी, स्टील-सिमेंट व्यापारी तसेच बांधकाम साहित्य व्यावसायिकांनाही या परिस्थितीचा फटका बसत आहे.डिझेलच्या तुटवड्याचा सर्वाधिक परिणाम शेतकरी वर्गावर होत आहे. द्राक्ष तसेच अन्य पिकांवरील कीटकनाशक फवारणीचे नियोजन विस्कळीत झाले असल्याचे शेतकरी राजेंद्र ढोकरे यांनी सांगितले. वणी येथील पेट्रोल पंपावर डिझेल शिल्लक नसल्याचा फलक.

“डिझेल १४ हजार लिटर दोन ते तीन दिवसांनंतर मिळते. पेट्रोल चार ते पाच हजार लिटर मिळते. पावर पेट्रोलचा दर जास्त असल्याने ग्राहक नाईलाजाने घेतात. मात्र एका पेट्रोल पंपावर प्रतिदिन किमान ४० हजार लिटरपेक्षा अधिक डिझेलची मागणी असते. सध्याच्या परिस्थितीत दोन ते तीन दिवसांनंतर केवळ १४ हजार लिटर डिझेल मिळत असल्याने वाहनचालकांच्या रांगा वाढल्या आहेत. – युवराज आहेर, व्यवस्थापक जगदंबा पेट्रोल पंप, वणी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *