![]()
अजिंठा लेणी आणि लोणार सरोवराला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग म्हणून अजिंठा-बुलढाणा राज्य मार्गाकडे पाहिले जाते. मात्र, सद्यस्थितीत हा मार्ग शिवना गाव परिसरात वाहतूक कोंडीचा मुख्य केंद्र बनले आहे. बसस्थानक आणि मुख्य बाजारपेठ परिसरात वाहनधारक अस्ताव्यस्त पार्किंग करीत असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी, दररोज या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, बुधवारी बाजाराच्या दिवशी तर परिस्थिती हाताबाहेर जाते. या गंभीर समस्येकडे स्थानिक पोलिस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. हा मार्ग छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गाला अजिंठा गाव येथे छेदतो. त्यामुळे विदर्भातील तीर्थक्षेत्र शेगाव, तसेच नागपूर आणि अमरावती या मोठ्या शहरांकडे जाण्यासाठी हाच रस्ता प्रमुख पर्याय आहे. मात्र, शिवना ही मोठी बाजारपेठ असल्याने या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा आडवी-उभी दुचाकी वाहने, चारचाकी गाड्या आणि हातगाड्यांनी अधिक भाग व्यापला आहे. सीसीटीव्हीचा वॉच ठेवून थेट गुन्हे दाखल करा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत हा रस्ता येत असला तरी ग्रामपंचायतीने रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी कधीही इच्छाशक्ती दाखवली नाही. या भागात वाढती गुन्हेगारी, अवैध व्यवसाय पाहता, सीसीटीव्ही बसविण्याची मागणी आहे. कारवाई करण्यात येणार Ãशिवना बसस्थानक आणि बाजारपेठ भागात अवैध पार्किंग करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना पोलिस प्रशासनाच्या वतीने वारंवार तोंडी समज दिली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाईल. – भागवत शेळके, बीट जमादार
Source link
अजिंठा-बुलढाणा राज्य मार्गावरील शिवना येथील वाहतूक कोंडी सुटेना:बाजारपेठेत वारंवार खोळंबा; शेगाव, नागपूरकडे जाणारे पर्यटक हैराण