Headlines

डासांनी उडवली शहरवासीयांची झोप; महिनाभरात आढळले डेंग्यूचे 10 रुग्ण:कष्टकरी, मध्यमवर्गीयांच्या वसाहतीतच नव्हे, तर उच्चभ्रू वस्तीतही डासांचा कहर‎



शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मोर्णा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या जलकुंभीमुळे जुने शहर परिसरात डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती वाढली आहे. सायंकाळी सहा नंतर कानाभोवती घोंगावणाऱ्या आणि हाता पायांना चावणाऱ्या डासांचा उपद्रव रात्री बारा वाजेप

.

डास निर्मूलनासाठी महापालिका प्रशासन कोणतेही प्रयत्न करत नाहीत. गेल्या वर्षभरात महापालिकेने डासांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी कोणत्याही प्रभावी उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. जुने शहरातील डाबकी रोड, जुने शहर, भीमनगर, नायगाव, जुल्फेकार दर्गा परिसर, आरपीडीएस रोड, गुलजार पुरा, शरीफनगर, रामजीपीर नगर, शिवाजीनगर, शिवसेना वसाहत, खैर मोहंमद प्लॉट, भगतवाडी, गीता नगर, उर्वरित पान ४

धुरळणी, फवारणीचे नियोजन ^डासांचा उपद्रव पाहता मोर्णेतील जलकुंभी काढण्याची महापालिकेने मोहीम सुरु केली आहे. शहरात धुरळणी, फवारणी प्रत्येक वॉर्डात दुचाकीवरील दोन स्प्रे पंपासह दोन कर्मचारी यांची नियुक्ती केली जाणार आहे. नवीन स्प्रे पंपासह फॉगिंग मशिनची खरेदीचे नियोजन केले असून मनपाने मलेरिया विभागात कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवली आहे. शहरात नियमित नाले, गटारींची साफसफाई आणि कचरा उचलण्याचे निर्देश सर्व स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आले आहेत.- विजय अग्रवाल, सभापती, स्थायी समिती, महापालिका.

शौचालयांच्या व्हेन पाइपला जाळ्या बसवा,तोंड झाकावे ^शहरात डासांचा उपद्रव वाढला हे सत्य आहे. जलकुंभी वनस्पती, उघड्या नाल्या, सांडपाण्याची साचलेली डबकी तसेच शहरातील शौचालयांचे व्हेन पाइप यामध्ये डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहे. सायंकाळच्या वेळी कानाभोवती घोंगावणारे क्युलेक्स डास यांची उत्पत्ती टाळण्यासाठी नागरिकांनी आपल्या शौचालयांच्या पाइपला जाळ्या बसवाव्यात किंवा पाइपचे वरचे तोंड कापडाने बांधून घ्यावे. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा. – डॉ. अतुल शंकरवार , जिल्हा िहवताप अधिकारी.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात- 44| महापालिका शहरी भागात- 49



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *