![]()
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपेने आयुष्यात मला सर्वकाही भरभरून मिळाले आहे. म्हणूनच आजवर मी प्रत्येक गरजू आणि सर्व समाज घटकांसाठी जेवढी करता येईल तेवढी मदत प्रामाणिकपणे करत आलो आहे. या सर्वांचे आशीर्वाद आणि विठ्ठल-रुक्मिणीची कृपा माझ्यावर आहे. पुण्याजवळ भीषण अपघात झालेला असताना वारकऱ्यांच्या रुपात खरंच माझा विठ्ठल मला वाचवण्यासाठी धावून आला,” असे भावूक उद्गार मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी काढले. पंढरपूरकडे येत असताना १४ मे रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर तळेगाव टोल नाक्याजवळ मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या फॉर्च्युनर गाडीचा भीषण अपघात झाला होता. पुणे येथील रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सध्या ते पंढरपुरातील घरी विश्रांती घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी दररोज विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. पंढरपूर येथे होत असलेल्या हरिनाम सप्ताहाचे निमंत्रण देण्यासाठी मुंबईला आलेले अकलूज व कोंडबावी येथील वारकरी, महाराज समाधान वाघमारे, सचिन यादव महाराज, धीरज यादव महाराज, दिगंबर घाडगे, हे योगायोगाने त्याच रस्त्याने पंढरपूरकडे येत होते. अपघाताच्या वेळी देवदूतासारखे धावून आलेल्या त्या वारकरी आणि महाराज मंडळींनी पंढरपूर येथे दिलीप धोत्रे यांच्या घरी येऊन त्यांची भेट घेतली व विचारपूस केली. चक्काचूर झालेल्या गाडीतून बाहेर काढले अपघात झाला आणि अवघ्या दोन मिनिटांत ते घटनास्थळी पोहोचले. आजूबाजूला अनेक गाड्या थांबून लोक फक्त बघत होते. पण वारकऱ्यांच्या रुपात आलेल्या या माझ्या विठ्ठलाने क्षणाचाही विलंब न करता, चक्काचूर झालेल्या गाडीतून बाहेर काढले. स्वतःच्या गाडीत घेतले आणि तातडीने पुणे येथील रुग्णालयात पोहोचवले.
Source link
वारकऱ्यांच्या रुपात विठ्ठल धावून आला:भीषण अपघातातून बचावल्यानंतर मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केली कृतज्ञता