![]()
शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील कॉलनी परिसरासह अनेक भागांमध्ये सतत विजेचा लपंडाव सुरू असल्याने व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले
.
या आंदोलनाचा अंदाज आल्यामुळे अभियंता यांच्या कार्यालयामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त आधीच तैनात करण्यात आला होता. परिणामी महावितरण कार्यालयाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील सिंगल फेज वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी मंजूर करून आणलेले डोंगर यावली येथील उपकेंद्र अद्याप सुरु करण्यात आले नाही. हे रखडलेले काम अधिक प्रलंबित होत असल्याने तसेच हिवरखेड-दापोरी कृषी फिडर लाईनची अपूर्ण दुरुस्ती व दापोरी गावठाण फिडरवरील विस्कळीत वीजपुरवठा आदी मुद्दे यावेळी अभियंत्यांसमोर ठेवण्यात आले.
याशिवाय “शेतकऱ्यांना न्याय द्या” “महावितरण प्रशासन जागे व्हा” अशा घोषणा देत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी कार्यकारी अभियंता यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून डोंगरयावली येथील सब स्टेशनचे काम तत्काळ पूर्ण करून मोर्शी शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्या सोडवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. धडक मोर्चामध्ये शेतकरी संजय पांडव, विनोद ठोके, अशोक राऊत, मंगेश चवळे, स्वप्नील निंबोरकर, प्रवीण रामटेके, धनंजय अमदारे, मयूर ढवळी, मनीष गुडधे, गजानन वानखडे, शेखर विघे, सूरज महल्ले, धीरज महल्ले, सागर चौधरी, गौरव सोनारे, शुभम मिश्रा, अन्वर खान, अमोल ठोके, सौरभ काळे, आयुष लांडे, राज माकोडे, चेतन माकोडे, कुणाल म्हाला, सौरभ बारमासे, संकेत बारमासे, अनुप केवतकर, परिमल माकोडे, सुदेश हटवार, गिरीश मानेकर यांच्यासह दापोरी,डोंगर यावली, घोडदेव,सालबर्डी हिवरखेड तसेच मोर्शी शहरातील नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान मोर्चाची दखल घेऊन कार्यकारी अभियंता यांनी डोंगरयावली येथील सब स्टेशनचे काम २० दिवसात सुरू करून नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले व मोर्शी शहरासह तालुक्यातील विजेच्या समस्या सोडवण्यासाठी तत्काळ उपाय योजना करून वीज ग्राहकांच्या समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील, असे सांगितले.
सबस्टेशनचे काम नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करु