![]()
आगारप्रमुख व दोन सहायक वाहतूक अधिकाऱ्यांनी अपमानित करून जातिवाचक बोलल्याने अपमान सहन न झाल्याने वाहतूक नियंत्रण शरद विठ्ठल भिवसने (४०, रा. वडोद चाथा, सिल्लोड, ह.मु लक्ष्मी कॉलनी, सिल्लोड) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी शहरातील आनंद पार्क परिसरात दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी मृताचे भाऊ पोपट विठ्ठल भिवसने यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले की, भाऊ शरद हे सिल्लोड आगारात सहायक वाहतूक नियंत्रक पदावर कार्यरत होते. मागील एक महिन्यापासून हृदयविकाराचा आजार असल्याने ते वैद्यकीय रजेवर होते. त्यांची बढती झाल्याने माझी सिल्लोडलाच नियुक्ती करावी म्हणून त्यांनी विनंती अर्ज सिल्लोड आगारप्रमुखांना दिला. दरम्यान, बुधवारी सकाळी नऊ वाजता ते हजर होण्यासाठी सिल्लोड आगारात गेले असता, तेथील आगारप्रमुख विजय काळवणे, सहायक वाहतूक अधिकारी किरण अवसरमल व विकास चव्हाण यांच्याकडे गेले असता “तुम्ही हजर होण्यासाठी आले असताना असे मळालेले कपडे, पायात चप्पल का घातली नाही, दाढी का केली नाही व आपल्या हुद्द्याचा पोशाख का घातला नाही?’ असे म्हणून त्यांनी जातीचा उल्लेख करून अपमानित केले. तो अपमान सहन न झाल्याने शरद भिवसने यांनी दुपारी बारा वाजेच्या सुमारास भराडी रस्त्यावरील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
Source link
सिल्लोडला वाहतूक नियंत्रकाची आत्महत्या:वरिष्ठांनी अपमानित केल्याची फिर्याद, आगारप्रमुखासह तिघांवर गुन्हा नोंद