Headlines

रामकथेसाठी भाविकांची गर्दी:‘श्रीराम जन्म’अन‌् ‘सीता स्वयंवर’ने वेधले लक्ष, उमराणेत श्री रामेश्वर महादेव मंदिरात अधिक मास सप्ताहाचा उत्साह‎



येथील देवस्थान असलेल्या श्री रामेश्वर महादेव मंदिरात अधिक मासानिमित्त आयोजित अखंड नामजप, कीर्तन सप्ताह, संगीतबद्ध रामकथा आणि बिल्व अर्चना पूजन सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः ‘राम जन्म’ आणि ‘सीता स्वयंवर’ या नाट्यमय प्रसंगां

.

सप्ताहादरम्यान सादर करण्यात आलेल्या संगीतबद्ध रामकथेला परिसरातील भाविकांची मोठी गर्दी होत आहे. प्रभू रामचंद्र आणि माता सीतेच्या विवाह सोहळ्याचे देखणे व नाट्यमय सादरीकरण होताच संपूर्ण मंडप ‘जय श्री राम’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. महिला भाविकांनी अक्षता आणि फुलांचा वर्षाव करत आनंदोत्सव साजरा केला. या वातावरणामुळे भाविक रामकथेत तल्लीन झाल्याचे चित्र दिसून आले.

सप्ताहाच्या चौथ्या दिवशी योगीराज महाराज गोसावी यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले. त्यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून ‘राम कृष्ण हरी’ नाममंत्राचे महत्त्व आणि भगवतप्राप्तीचा मार्ग सोप्या भाषेत विशद केला. निरूपण करताना ते म्हणाले, मनुष्य जन्मापासून चिंता आणि चिंतनात अडकलेला असतो. प्रत्येक जीव हा परमात्म्याचाच अंश आहे. संतांनी संसारात राहूनही परमेश्वरप्राप्तीचा आदर्श घालून दिला आहे. कमळाचे फूल पाण्यात राहूनही जसे अलिप्त राहते, तसेच माणसाने संसारात राहून आसक्तीपासून दूर राहिले पाहिजे. संसाराने आपल्याला पकडलेले नाही, तर आपणच संसाराला पकडून ठेवले आहे. हीच आसक्ती माणसाच्या पतनाला कारणीभूत ठरते. यावेळी त्यांनी संत सावता महाराज तसेच नाभिकाचे काम करत असतानाही अखंड नामस्मरण करणारे संत सेना महाराज यांचे दाखले दिले. भगवतप्राप्तीसाठी चित्तवृत्ती शुद्ध असणे आवश्यक आहे,” असे सांगत योगीराज महाराजांनी संतसंगती आणि सद्गुरूंच्या दर्शनाचे महत्त्व स्पष्ट केले. “माता, पिता किंवा इतर कोणीही जीवाला भवसागरातून तारू शकत नाही. केवळ सद्गुरूंच्या कृपेनेच जीवनाचा उद्धार होतो. योग्य गुरूंचा अनुग्रह आणि शिष्याची निष्ठा याशिवाय आध्यात्मिक उन्नती शक्य नाही’, असेही त्यांनी सांगितले.

संत-कीर्तनकारांचे मार्गदर्शन या सोहळ्यासाठी विविध संत व कीर्तनकारांचे मार्गदर्शन लाभत आहे. अनंत महाराज वहाढणे संगीतबद्ध रामकथेचे प्रवक्ते म्हणून कार्यरत असून, विश्वनाथ महाराज कोल्हे हे व्यासपीठ नेतृत्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. तर चंद्रकांत महाराज हे सहव्यासपीठ चालक म्हणून कार्यरत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *