Headlines

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून शेतकऱ्यांचे आंदोलन:मक्रणपूर पुलावर शीवरस्त्यासाठी शेतकऱ्यांचा दोन दिवसांपासून सत्याग्रह‎




सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील मक्रणपूर पुलावर शीव रस्त्यासाठी शेतकरी सोमवारपासून सत्याग्रह करत आहेत . शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून निषेध केला. यासंदर्भात किसान सभेचे कार्यकर्ते बापू गवळी यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग गट नंबर ५२ ते गट नंबर २१ अशा तीन किलोमीटर शिव रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे. यासंदर्भात आतापर्यंत पाच वेळा आंदोलने केली. तहसीलदार सारिका भगत यांनी शिवरस्ता लवकरच करून देऊ असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने दादा शेख बागवान, गोकुळ शिवाजी वाकळे, छोटू पटेल, सुबोध कुलकर्णी, दिगंबर कुलकर्णी, दिगंबर थेटे, दीपक कडबा सातदिवे, पांडू तुकाराम मुरकुंडे, राजू भिका काकडे, शिवराम पवार मुकादम आदी शेतकरी मक्रणपूर रंद पुलावर सोमवारपासून सत्याग्रह करत आहेत. या ठिकाणी महसूल विभागाचे सिसोदे व लिपिक साळवे यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. मात्र ती फिसकटल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून निषेध व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *