Headlines

Chandrashekhar Bawankule Claims Devendra Fadnavis Maharashtra CM Till 2034


राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडारा येथे एक महत्त्वाचा दावा केला आहे. त्यांच्या मते, देवेंद्र फडणवीस हेच २०३४ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील आणि हीच राज्यातील १४ कोटी जनतेची भावना आहे. त्यांच्या या विधानामुळे देवेंद्र फडणवी

.

देवेंद्र फडणवीस लवकरच दिल्लीत जाऊन केंद्रात अर्थमंत्री होणार, अशा राजकीय चर्चा अधूनमधून सातत्याने रंगत असतात. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी केलेले हे विधान राजकीय वर्तुळात अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

भंडारा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना, नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाची जोरदार पाठराखण केली. ते म्हणाले की, महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेणारे दूरदृष्टी असलेले अष्टपैलू नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या कार्यकाळात राज्याने अनेक महत्त्वाचे पायाभूत प्रकल्प आणि लोकहिताचे गतिमान निर्णय पाहिले आहेत.

यामुळेच राज्यातील जनतेचा त्यांच्यावर आणि महायुती सरकारवर अतूट विश्वास आहे, असे बावनकुळे यांनी नमूद केले. देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीत जाण्याच्या आणि केंद्रात मोठी जबाबदारी सांभाळण्याच्या चर्चांना त्यांनी जाणीवपूर्वक पूर्णविराम दिला. आगामी काळातही त्यांच्याच नेतृत्वाखाली राज्याची विकासाची घोडदौड अधिक वेगाने सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा…

दिल्लीला जाणार का? प्रश्नावर फडणवीसांचे मिश्किल उत्तर!:शेतकरी कर्जमाफी, बोगस बियाणे आणि मोशी दुर्घटनेवरही केले मोठे भाष्य

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांकडून सुरू असलेल्या ‘दिल्लीवारीच्या’ चर्चांना मिश्किल उत्तर दिले. यासोबतच राज्यातील पावसाची स्थिती, ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफी, बोगस सोयाबीन बियाणे, नागपुरातील ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर आणि मोशी इमारत दुर्घटना अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी सविस्तर माहिती दिली. सविस्तर वाचा…

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत:राज्यात भाजपची सूत्रे बावनकुळेंकडे जातील, संजय राऊतांची राजकीय भविष्यवाणी

“भारतीय जनता पार्टीची वाटचाल देशातील लोकशाही मोडीत काढण्याच्या दिशेने सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे भारतातही ‘राष्ट्राध्यक्ष पद्धत’ लागू करण्याच्या हालचाली केंद्रात सुरू आहेत,” असा अत्यंत गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकार, २०२९ च्या निवडणुका आणि महाराष्ट्रातील नेतृत्वाबाबत अनेक मोठे राजकीय दावे केले आहेत. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.