Headlines

पीएमआरडीएने पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुखांचा केला सत्कार:वडकी नाला, कदमवाकवस्ती येथे वारकऱ्यांसाठी फराळ, पाण्याची व्यवस्था




पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. सासवड रस्त्यावरील वडकी नाला आणि पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदमवाकवस्ती येथे हे स्वागत करण्यात आले. पीएमआरडीएने वारीतील दिंडीप्रमुखांचा सत्कार केला, तसेच वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी व फराळाचे वाटप केले. महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही प्रमुख पालखी मार्गांवर विशेष स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. सासवड रस्त्यावरील वडकी नाला येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यानंतर पीएमआरडीएच्या वतीने दिंडीप्रमुखांचा सन्मान करण्यात आला. कार्यकारी अभियंता नंदकुमार कोरके आणि उपअभियंता नंदकुमार खोत यांच्या संयोजनाखाली हा उपक्रम पार पडला. कनिष्ठ अभियंता संकेत सानप, ललित शिंदे, कार्तिक पाटील, पुरुषोत्तम शामल, किरण कोष्टी आणि अनिल जाधव यांनी वारकऱ्यांना सेवा पुरवण्यात सक्रिय सहभाग घेतला. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पुणे महानगर अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन पथक (पीडीआरएफ) या ठिकाणी तैनात होते. दुसरीकडे, पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदमवाकवस्ती येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. येथे कार्यकारी अभियंता शिवकुमार कुपल, सहाय्यक लेखाधिकारी पूनम बोराटे आणि उपअभियंता अमित तिडके यांच्या उपस्थितीत दिंडीप्रमुखांचा सन्मान करण्यात आला. वारीतील विठ्ठल भक्तांसाठी फराळ व पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ अभियंता जयेश भदाणे, गणेश सुतार, गोविंद सरगर, पूजा देसाई आणि सोनाली ताकते यांनी परिश्रम घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *