Headlines

विद्यालयात रूजू होण्यासाठी गेलेल्या सेवकास संस्थाध्यक्षांकडून शिवीगाळ:व्हिडीओ व्हायरल, संस्था म्हणाली – सेवकाने स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली




सेनगाव तालुक्यातील पळशी येथील रुख्मिणी विद्यालयात एक वर्षानंतर रूजू होण्यासाठी गेलेल्या सेवकास संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष व मुख्याध्यापकाने शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला असून या प्रकरणी सेवकाने शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रारही केली आहे. तर दुसरीकडे संबंधित सेवकाने स्वेच्छा निवृत्ती घेतल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. या संदर्भात सेवक गणेश खाटेकर यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे पत्र दिले आहे. सेनगाव तालु्क्यातील पळशी येथील रुख्मिणी विद्यालयात सन १९९९ पासून सेवकपदावर कार्यरत असून ता. १४ ऑगस्ट २०२५ पासून रजेवर होतो. ता. ८ जुलै २०२६ रोजी शाळेत रूजू होण्यासाठी गेल्यानंतर रुजू करून घेण्यात आले नाही. यावेळी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष शिवराम वाठोरे व मुख्याध्यापक पी. के. तावरे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संस्थेकडून आपल्या जिवीतास धोका असल्याचेही पत्रात नमुद केले आहे. या पत्राच्या प्रती जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आल्या आहेत. या शाळेवर शिवीगाळ झाल्याचा व्हिडीओ देखील समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, संबंधित शाळेच्या संस्थाध्यक्ष व मुख्याध्यापकाकडून आपल्या जिवीतास धोका असल्याचे सेवक खाटेकर यांनी दिलेल्या पत्रात नमुद केले आहे. या संदर्भात मुख्याध्यापक पी. के. तावरे यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित सेवकाने एक वर्षापूर्वी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली असून त्यांच्या सेवानिवृत्ती वेतनाचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र त्यानंतही ते आता रूजू करून घ्या असा आग्रहधरीत असून हे नियमाला धरून नाही. त्यामुळे त्यांना रूजू करून घेतले नाही. गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत चौकशी करणार – विपुल भागवत, शिक्षणाधिकारी हिंगोली या शाळेतील सेवक गणेश खाटेकर यांनी आपल्याकडे येऊन सविस्तर माहिती दिली आहे. मात्र त्यांचा अर्ज माझ्याकडे आलेला नाही. त्यांच्या अर्जानुसार गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत चौकशी केली जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *