Headlines

आई-वडिलांना विसरू नका, ते परत मिळत नाहीत- भुसारे:कन्नड तालुक्यातील शेलगाव पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन‎




जगात सर्व काही मिळेल, पण आई-वडील परत मिळणार नाहीत. ज्या आई-वडिलांनी हाताचा पाळणा केला, त्या आई-वडिलांना कधीच विसरू नका, असे प्रतिपादन ह.भ.प. रेणुका भुसारे यांनी केले. कन्नड तालुक्यातील शेलगाव येथील सोसायटीचे माजी संचालक दौलत सांडू शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मंगळवारी (२६ मे) कार्यक्रम झाला. कीर्तनरूपी सेवेतून रेणुका भुसारे बोलत होत्या. शेलगावचे सरपंच विलास मनगटे, गणेश भुसारे, प्रदीप मनगटे, अमोल महाराज उपस्थित होते. रेणुकाताई म्हणाल्या, कलियुगात मुलाने बापाला भक्ती दिली तरी फार मोठी गोष्ट आहे. जगात कोणत्याही महाराजांचा, पंडितांचा आशीर्वाद कधी कामी येणार नाही. आयुष्य योग्य रीतीने जगायचे असेल तर पाठीवर बापाची थाप पाहिजे. डोक्यावर आईच्या मायेची सावली पाहिजे. त्याच्यासारखा श्रीमंत या जगात दुसरा कुणी नाही. कीर्तनाला मृदंगाची साथ ह.भ.प. कृष्णा भुसारे यांनी दिली. गायनाची साथ अमोल महाराज, दयानंद महाराज, वारकरी संप्रदायाचे विद्यार्थी यांनी दिली. साहेबराव शिंदे, भास्कर शिंदे, बाजीराव शिंदे, नारायण शिंदे, सोमीनाथ शिंदे, संतोष शिंदे, शंकर वाघ, पोपट भिकानराव मनगटे, विशाल भुसारे यांच्यासह शिंदे यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी ग्रामस्थ उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *